‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ

पेनी स्टॉकमध्ये असेल्या कंपनीचे शेअर्स विकत घेताना कंपनीच्या धोरणाचा चांगला अभ्यास केल्यास त्यातून देखील मोठा फायदा होतो. हेच आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समधून समोर आले आहे.

'या' कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 10:52 AM

नवी दिल्ली – पेनी स्टॉकमध्ये पैसा गुंतवणे तसे जोखमीचे काम असते, अशा कंपन्यांच्या शेअर्समधून कधीकधी चांगला परतावा मिळतो. मात्र अशा कंपान्याचे बाजारमूल्य हेच मुळात कमी असल्याने  देशांतर्गंत घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोंडिचा देखील कंपनीच्या शेअर्सवर परिणाम होतो. शेअर्स कोसळण्याची भीती असते. मात्र पेनी स्टॉकमध्ये असेल्या कंपनीचे शेअर्स विकत घेताना कंपनीच्या धोरणाचा चांगला अभ्यास केल्यास त्यातून देखील मोठा फायदा होतो. हेच आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समधून समोर आले आहे. आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सधारकांना कमी पौशांमध्ये मोठा लाभ मिळाला आहे.

20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ

आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स सातत्याने वाढत आहे.  28 नोव्हेंबर 2001 मध्ये आरती इंडस्ट्रीजच्या प्रति शेअर्सची किंमत ही 1.51 रुपये एवढी होती. तर गेल्या 8 नोव्हेंबरला ती प्रती शेअर्स 972.20 रुपयांवर बंद झाली आहे. म्हणजेच गेल्या 20 वर्षांमध्ये या कंपनीचे शेअर्स 650 टक्क्यांनी वाढले आहेत. 2001 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 20 हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवली होती. ते गुंतवणुकदार आज कोट्याधीश झाले आहेत.

1.30 कोटी रुपयांचा परतावा

ज्या गुंतवणूकदारांनी आरती इंडस्ट्रीजमध्ये 20 वर्षांपूर्वी 20 हजारांची गुंतवणूक केली होती. त्या शेअर्सधारकांना आज तब्बल  1.30 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना तब्बल 65 हजार टक्क्यांनी अधिक परतावा मिळावा आहे. शेअर्सची किंमत अनेक पटींनी वाढल्यामुळे 2001 ला 20 हजार रुपयांमध्ये जेवढे शेअर्स विकत घेता येत होते. तेवढे शेअर्स आता विकत घेण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. पेनी स्टॉकमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार नसतात, मात्र योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्यातून चांगाला परतावा मिळू शकतो हेच यातून दिसून येते.

पेनी स्टॉक म्हणजे काय?

दर्शनी मूल्यापेक्षा कमी बाजारभाव असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक असे म्हटले जाते. अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 100 कोटीहून कमी असते. अमेरिकेत 5 डॉलरपेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक असे संबोधले जाते. जरी अशा शेअर्समधून प्रचंड नफा होण्याची शक्यता असली, तरी अचानक डिलिस्ट होऊन त्यात मोठया प्रमाणात पैसे अडकून नुकसान होण्याची शक्यता देखील असेत. त्यामुळे अनेकजण अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळतात.

संबंधित बातम्या 

बांधकामासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ; विकासकांचे नुकसान, किमती नियंत्रणात आणण्याची मागणी

नवे कृषी कायदे रद्द झाल्याचा उद्योग क्षेत्राला फटका ; कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ कमी होणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.