Money9: सणासुदीपूर्वी गाड्या महागणार? ग्राहकांच्या खिशातूनच वसुलीची तयारी

गाड्यांचे टायर आणि इतर ऑटो उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या आता आपल्या उत्पानांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे गाडी तयार करणाऱ्या ऑटो कंपन्यांचे मूल्य वाढू शकते. आणि हा सर्व खर्च आटो कंपन्या ग्राहकांच्या खिशातूनच वसूल करणार.

Money9: सणासुदीपूर्वी गाड्या महागणार? ग्राहकांच्या खिशातूनच वसुलीची तयारी
वाहनाच्या किंमती वाढणार
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 27, 2022 | 10:06 AM

Money9: श्रावण महिना लागल्यावर सणांची तयारी सुरु होते. देशभरात थोड्याच दिवसात सणासुदीचे (Festivals) वातावरण सुरु होईल आणि त्यापूर्वीच कार, गाड्यांचे दर (Car price may rise) पुन्हा एकदा वाढतील. वाढत्या महागाईमुळे जनता आधीच त्रस्त असताना आता गाड्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वेळी दर वाढल्यानंतर ऑटो कंपन्यांनी (Auto Companies) दरवाढीचा पूर्ण भार ग्राहकांवर टाकला नव्हता. मात्र आता परिस्थिती वेगळी असून, ऑटो कंपन्या गाड्यांचे दर वाढवून त्याची वसुली ग्राहकांच्या खिशातून करु शकतात, त्यामुळे ग्राहकांनाच भुर्दंड सहन करावा लागू शकतो. सणांना सुरुवात होण्यापूर्वीच गाड्यांचे दर वाढलेले पहायला मिळू शकतात. त्यातच गाड्यांचे टायर आणि इतर ऑटो उपकरणे बनवणाऱ्या कंपन्याही सप्टेंबर महिन्यात आपल्या उत्पानांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गाडी तयार करणाऱ्या ऑटो कंपन्यांचे मूल्य वाढू शकते. आणि हा सर्व खर्च आटो कंपन्या ग्राहकांच्या खिशातूनच वसूल करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे नवी कार घ्यायच्या विचारात असाल तर थोडं थांबा अन्यथा वाढत्या दरांमुळे तुमच्या खिशालाही फटका बसू शकेल.

कार, गाड्या यांच्या किमती, वाढते दर यांच्याविषयी तसेच आर्थिक विषयासंदर्भातील आणखी माहिती जाणून घेण्यासाठी Money9 चे ॲप्लीकेशन https://onelink.to/gjbxhu या लिंकद्वारे डाऊनलोड करू शकता.

तुम्हाला या विषयावर आणखी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास Money9 चे ॲप डाऊनलोड करा. आणि आजचा Money Central हा कार्यक्रम पहा. Money9 चे संपादक अंशुमान तिवारी यांनी या विषयासंबंधी Money Central कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे Money9 ?

Money9 चे OTT ॲप आता गूगल प्ले आणि IOS वर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सात भाषा असून अर्थ व्यवहारासंबंधी सर्व माहिती मिळू शकते. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी टॅक्स, अर्थविषयक सर्व माहिती, ज्याचा तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकेल, अशा सर्व गोष्टी येथे जाणून घेता येतील. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता मनी9 ॲप डाऊनलोड करा आणि तुमची अर्थ विषयक समज वाढवा.