AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ हा सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने मोठी आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे.

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव
सीएनजी
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 8:31 AM
Share

मुंबई :  CNG PNG Price Hike इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ हा सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने मोठी आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. मुंबईला सीएनजी व पीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीनुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो दीड रुपयांची वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

असे असतील नवे दर

सीएनजीच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीनंतर मुंबईत सीएनजीची किमंत प्रति किलो 63.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर पीएनजीची किंमत प्रति युनिट 38 रुपये झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल 16 वेळेस गॅसचे दर वाढवण्यात आले आहेत. या गॅस दरवाढीचा फटका आठ लांखापेक्षा अधिक ग्राहकांना बसत आहे.

कोणावर होणार परिणाम 

सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम हा सीएनजी इंधनावर चालणारी गाडी असणाऱ्या तीन लाख ग्राहकांवर होणार आहे. सीएनजी महागल्याने सार्वजनिक क्षेत्रातील वाहन सेवेच्या दरांमध्ये देखील वाढ होऊ शकते. याचा फटका हा प्रवाशांना बसू शकतो. गेल्या तीन महिन्यांमध्ये चौथ्यांदा सीएनजीचे दर वाढवण्यात आले आहेत. सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र त्यातुलनेत काळी पिवळी आणि ऑटो रिक्षाचे भाडे स्थिर असल्याने त्यांना देखील मोठा तोट सहन करावा लागत आहे. सीएनजीचे वाढते दर पहाता भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी विविध रिक्षा चालक-मालक संघटनांकडून होत आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी दुसरीकडे मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

संबंधित बातम्या

1 जानेवारीपासून तुमच्या खिश्याला एटीएमची झळ ! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या प्रत्येक व्यवहाराला किती मोजावे लागेल शुल्क

छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक झाली कमी, डिमॅट खात्यांमध्ये दुपटीने वाढ; काय आहेत कारणे?

अर्थव्यवस्थेला अच्छे दिन, चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.3 टक्के राहण्याचा अंदाज; ब्लूमबर्गचा अहवाल

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती