AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 जानेवारीपासून तुमच्या खिश्याला एटीएमची झळ ! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या प्रत्येक व्यवहाराला किती मोजावे लागेल शुल्क

सेवा शुल्कासह एटीएममधून रक्कम काढणे नवीन वर्षात महाग होणार आहे. खासगी बँकांनी सेवा शुल्कात वाढ केली आहे, तसेच एटीएमचे व्यवहारही सशुल्क असणार आहेत. जाणून घेऊयात प्रत्येक व्यवहाराला तुमच्या खात्यातून किती रक्कम शुल्कापोटी कपात केली जाईल. 

1 जानेवारीपासून तुमच्या खिश्याला एटीएमची झळ ! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या प्रत्येक व्यवहाराला किती मोजावे लागेल शुल्क
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 7:49 AM
Share

नवी दिल्ली : येत्या 1 जानेवारीपासून बँक ग्राहकांना सेवांपोटी अधिक शुल्काचा फटका बसणार आहे. अनेक बँकांनी आर्थिक आणि गैरआर्थिक सेवा नियमांत बदल केले आहेत. हे बदल येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लागू होतील. पोस्ट खात्यातंर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकनेही एटीएम व्यवहार, बँक व्यवहार नियमांमध्ये बदल केला आहे. 1 जानेवारीपासून हे नवीन नियम लागू होतील. नवीन वर्षाचे स्वागत करतानाच खिश्याला झळ पोहचविणाऱ्या या नवीन नियमांबद्दल ग्राहकांनी जागरुक रहावे.

सर्वात अगोदर टपाल खात्याच्या पेमेंट बँकेविषयी जाणून घेऊयात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून (IPPB)  सुरुवातीचे चार व्यवहारावर शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. तुम्हाला निःशुल्क रक्कम काढता येईल.  मात्र त्यानंतर बचत खात्यातून अथवा एटीएममधून व्यवहार केल्यास शुल्क आकारणी करण्यात येईल. जितकी रक्कम काढणार आहात तिच्या 0.50 टक्के वा प्रति व्यवहार 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे.

व्यवहार केला तर शुल्क मोजा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या सुविधेला कुठलाही आकार पडणार नाही. त्यासंबंधी चार्जेस द्यावे लागणार नाहीत. या नियमांत कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र बेसिक सेव्हिंग अकाऊंटच्या व्यतिरिक्त अन्यप्रकारचे बचत खाते असल्यास अथवा चालू खाते असल्यास अशा व्यवहारांवर प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत कुठलीही शुल्क आकारणी नाही. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला 0.50 टक्के वा कमीत-कमी 25 रुपेय प्रति व्यवहार शुल्क मोजावे लागेल. बेसिक अकाऊंट ऐवजी अन्य बचत खाते वा चालू खात्यात प्रति महिना 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत होतील. त्यानंतरच्या रक्कमेवरील व्यवहाराला 0.50 अथवा कमीतकमी 25 रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

CICI Bank ची शुल्कात वाढ

खासगी बँकांनीही व्यवहारावरील नियमांमध्ये आणि शुल्क आकारणीत बदल केला आहे. ICICI Bank ने सेवा शुल्कात वाढ केली आहे. बचत खात्यावर या नवीन नियमांचा थेट परिणाम 1 जानेवारी 2022 पासून दिसून येईल. 1 जानेवारीपासून एटीएम व्यवहारही सशुल्क होतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे. नवीन वर्षात या बँकेच्या एटीएममधून सुरुवातीच्या पाच व्यवहारावर कुठलेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. तुम्ही पाचवेळा रक्कम काढल्यास खिशाला झळ बसणार नाही. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी मात्र 21 रुपये मोजावे लागतील. 5 निःशुल्क व्यवहारानंतर सेवा सशुल्क होईल. आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येकी 21 रुपये तर इतर सेवांसाठी प्रति सेवा 8.50 रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल.

HDFC आणि AXIS Bank ने पण केले बदल

HDFC बँकेच्या ग्राहकांना एका महिन्यात 5 बँकिंग व्यवहार निःशुल्क असतील. हे नियम देशातील सर्व शहरांना लागू आहेत. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बंगळुरू आणि हैदराबाद या मेट्रो शहरातील एटीएममधून प्रत्येक महिन्याला केलेल्या पहिल्या 3 व्यवहाराला कुठलेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. या व्यवहारात आर्थिक अथवा इतर सेवांचा समावेश आहे. त्यानंतर HDFC बँकेच्या ग्राहकांना पुढील व्यवहारासाठी खिश्याला झळ बसेल. ठरवून दिलेल्या व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारापोटी ग्राहकाला 21 रुपये मोजावे लागतील. HDFC बँके व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएम धारकांना व्यवहारापोटी 8.5 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.  AXIS Bank ने ही याच व्यावहारिक मार्गाचा अवलंब केला आहे. एक्सिस बँकेच्या कार्डधारकांना सुरुवातीचे पाच व्यवहार दरमहिन्यांला निःशुल्क आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारापोटी ग्राहकाला 20 रुपये मोजावे लागतील. तर इतर सेवांसाठी 10 रुपये भूर्दंड पडेल. 1 जानेवारी 2022 पासून हे नियम लागू असतील .

संबंधित बातम्या 

छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक झाली कमी, डिमॅट खात्यांमध्ये दुपटीने वाढ; काय आहेत कारणे?

अर्थव्यवस्थेला अच्छे दिन, चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.3 टक्के राहण्याचा अंदाज; ब्लूमबर्गचा अहवाल

क्रेडिट कार्डची कुंडली; जाणून घ्या, क्रेडिट कार्डवरील छुप्या शुल्कांची माहिती

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.