Crude Oil Price : 90 दिवसात पहिल्यांदाच कच्च तेलं स्वस्त, भारताला होणारे हे 6 मोठे फायदे

Crude Oil Price : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने तेलाच्या किंमती वाढत होत्या. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम सुरु होता.

Crude Oil Price : 90 दिवसात पहिल्यांदाच कच्च तेलं स्वस्त, भारताला होणारे हे 6 मोठे फायदे
Crude Oil
| Updated on: Nov 24, 2026 | 3:17 PM

आखातामध्ये आधीपासूनच तणाव आहे. त्यात आणखी भर पडेल अशी वक्तव्य सुरु आहेत. मात्र, हॉर्मुज स्ट्रेट मधून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. आखाती देशातील कच्चं तेल 90 डॉलर आणि अमेरिकी क्रूड ऑइलचे दर 80 डॉलर प्रति बॅरल पेक्षा कमी झाले आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्चा तेलाचे दर तीन महिन्यात सर्वात स्वस्त दिसत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 27 टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. अमेरिकी क्रूड ऑइल डब्ल्यूटीआयच्या किंमतीत जवळपास 24 टक्के घसरण दिसून आलीय.

आखाती देशामधून ज्या बातम्या येत आहेत, त्यातून भारताला अनेक फायदे मिळू शकतात. सर्वात जास्त फायदा शेअर बाजारात दिसेल. कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्याने शेअर बाजारात तेजी येऊ शकते.

Loading...

1  कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशात परदेशी गुंतवणूकदाराचं आगमन होईल. शेअर बाजारात तेजी दिसू शकते. नोव्हेंबर महिन्यात हे असं पहायला मिळालय. कच्चं तेल 20 टक्क्यापेक्षा जास्त स्वस्त होताच परदेशी गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटीपेक्षा जास्तची गुतंवणूक केली. त्यामुळे शेअर बाजारात 10 टक्क्यापेक्षा जास्त तेजी दिसून आली.

2 भारताच्या आयात बिलाच्या वाट्यात सर्वात मोठा हिस्सा कच्चा तेलाचा असतो. मॅरिटाइम गेटवेच्या रिपोर्ट्नुसार ऑक्टोंबर 2026 मध्ये भारताचं कच्चा तेलाच्या आयातीचं बिल 88 टक्क्याने वाढून 19.5 अब्ज डॉलर झालं. एप्रिल ते ऑक्टोंबर 2026 दरम्यान कच्चा तेलाच्या आयातीचा एकूण खर्च 111 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेलं. कच्चा तेलाच्या किंमती खूप जास्त होत्या. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होता. आता दोघांमध्ये सुधारणा आहे. रुपया 93 च्या लेवलवर मजबूत आहे. त्यामुळे आयात बिल कमी होऊ शकतं.

3 नोव्हेंबर महिन्यापासून कच्चा तेलाच्या किंमतीत सुधारणा झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे. रुपयातही सुधारणा झालीय. 95 वरुन रुपया 93 च्या लेवलवर आहे. काही दिवसांपूर्वी हाच आकडा 92.50 च्या लेवलवर मजबूत दिसत होता. येणाऱ्या दिवसात रुपया अजून मजबूत होऊ शकतो.

4 कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्याने आयात सामान स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या वस्तू थोड्या स्वस्त होतील. लोकांच्या खिशात पैसे वाचतील. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो, तेव्हा परदेशी सामान महाग होतं. त्यामुळे देशातील नागरिकांबरोबरच परदेशात शिक्षणासाठी गेलेले त्यांच्या खिशावर बोझा वाढतो.

5 कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे महागाई कमी होण्याची शक्यता आहे. जेट फ्यूलच्या किंमती कमी होऊ शकतात. नोव्हेंबर महिन्यात सलग चौथ्यांदा वाढ झालेली. दिल्लीत जेट फ्यूलच्या किंमतीत 28.37 रुपये प्रतिलीटर वाढ झाली आहे. कच्च तेलं स्वस्त झाल्याने हे दर कमी होऊ शकतात. गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा कमी होऊ शकतात.

6 कॅडमध्ये कमी, रुपयात तेजी, आयातीत सामान स्वस्त होणं, महागाईच्या पार्श्वभूमीवर आयात बिलात कमतरता हे सर्व फॅक्टर महत्वाचे आहेत. त्यामुळे इकोनॉमीला बूस्ट मिळतो. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7 टक्के राहू शकतो. कच्चं तेल अजून स्वस्त झाल्यास हा विकास दर 7.5 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us