AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगार येताच संपला? ChatGPT चा बचतीचा मंत्र, असा वाचवा पैसा

Money Saving Tips by ChatGPT: सध्या महागाईने नागरिक त्रस्त आहेत. केवळ कमाई करणे महत्त्वाचे नाही. तर बचत सुद्धा गरजेची आहे. त्यावर ChatGPT ने मोलाचा सल्ला दिला आहे. चॅटजीपीटीने एक व्यवहारिक तोडगा सांगितला आहे.

पगार येताच संपला? ChatGPT चा बचतीचा मंत्र, असा वाचवा पैसा
पगार बचतीचा चॅटजीपीटीचा सल्लाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 2:16 PM
Share

How To Save Money: अनेकदा पगार झाला की तो अवघ्या दोन-चार दिवसात संपतो. पगार मग एक तारखेला होऊ की सात तारखेला, अथवा महिन्याच्या अखेरीस पगार झाला काय? अनेकदा या पैशाला पाय फुटतात. एआयच्या (AI) युगात प्रत्येकाकडे जवळपास स्मार्टफोन हाती आला आहे. त्यात युझर्स ChatGPT चा पर्याय समोर आला आहे.  चॅटजीपीटीला अनेक जण विविध विषयांवर मार्गदर्शन मागतात.  फॅशन, स्टायलिंगपासून ते कुकिंग आणि अभ्यासाच्या टिप्स यासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. आर्थिक सल्ल्यासाठी सुद्धा चॅटजीपीटीचा वापर होतो. चॅटजीपीटीला पगारातील रक्कम वाचवण्याविषयी आणि बचतीविषयी सल्ला विचारण्यात आला. काय दिला चॅटजीपीटीने सल्ला?

ChatGPT च्या स्मार्ट सेव्हिंग टिप्स

पगार येताच अगोदर बचतीचे नियोजन करा.

आजपासूनच खर्च कुठे आणि किती झाला हे नमूद करा.

UPI आणि Credit Card खर्च मर्यादा आखा, ती निश्चित करा.

सवलतीच्या मोहात अतिरिक्त शॉपिंग टाळा, वायफळ खर्च होऊ देऊ नका.

योजना आखा आणि छोटी बचत करा आणि ती रक्कम गुंतवा.

गरजेवेळी अत्यावश्यक निधीची तरतूद करून ठेवा.

एखादे ठिकाणी नाहक Subscription सुरू असेल तर ते तपासा.

मासिक आर्थिक ताळेबंद अगोदरच आखा, त्यानुसार खर्च करा.

नाहक शॉपिंग टाळण्याचा प्रयत्न करा, ऑनलाईन वस्तू दिसली की ती गरज नसताना खरेदी करू नका.

50-30-20 नियम फायदेमंद आहे, त्याचा प्रयोग करून पाहा.

बचत तर कराच पण गुंतवणूकही करा

सर्वात अगोदर तुमच्या अत्यावश्यक गरजा ओळखा. त्यानंतर पगार जमा झाल्यावर त्यातील 10 ते 20 टक्के रक्कम बाजूला काढा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन खर्च कुठे आणि किती होतो. त्यात अनावश्यक खर्च किती केला याचा रोज मागोवा घ्या.

50-30-20 चा नियम पाळा. त्यात 50% अत्यावश्यक खर्च, 30% लाईफस्टाईलवरील खर्च तर 20% बचत असे नियोजन करा.

महिन्याला 500 वा 1000 रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये  SIP वा RD सुरू करा. कारण ही कासवासारखी बचत तुम्हाला दीर्घकाळानंतर मोठा परतावा देईल.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी