LPG कमिशनवर 47 रुपयांची वाढ करण्याच्या मागणीवर विक्रेते ठाम; घरगुती गॅस सिलेंडर महागणार?

LPG Price Hike: वाढत्या ऑपरेटिंग कॉस्टमुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी विक्रेत्यांनी अधिक कमिशनची मागणी केली आहे. एलपीजीवरील कमिशनमध्ये 47 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे घरगुती गॅसच्या किमतींसोबतच पेट्रोलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

LPG कमिशनवर 47 रुपयांची वाढ करण्याच्या मागणीवर विक्रेते ठाम; घरगुती गॅस सिलेंडर महागणार?
LPG gas cylinder price may hike
| Updated on: Nov 18, 2026 | 8:05 AM

सवर्सामान्यांची महागाई काही पाठ सोडत नाहीये. अजून एक मोठा झटका लागू शकतो. येणाऱ्या आगामी दिवसात घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात. याचं कारण असं की, देशभरातील LPG डिस्ट्रीब्यूटर्सने गॅस सिलेंडरवरचं कमिशन 47 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंप ऑपरेटर्सनेही 30 ते 40% वाढीच्या मागणीवर अडून बसले आहेत. डीलरच्या म्हणण्यानुसार, वाढती महागाई आणि ऑपरेटिंग कॉस्ट काम करणे कठीण होत चालले आहे. पण जर सरकारी मार्केटिंग कंपनी (OMCs) त्याच्या मागण्या मान्य करतील तर येणाऱ्या दिवसात घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले दिसतील.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीमधल्या सूत्रानुसार, सतत वाढत्या महागाईमुळे आमच्यासाठी एलपीजी हब आणि पेट्रोल पंप चालवणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. कामगारांचे पगार यांसारख्या मजुरीच्या खर्चात वाढ होत आहे. त्यासोबतच ऑपरेटर्स ग्राहकांना अनेक सेवा मोफत पुरवतात जसे की, वाहनांच्या टायरमध्ये हवा भरून देणे. या सर्व गोष्टींमुळे आमची कमाई हळूहळू कमी होत आहे.

Loading...

डीलरच्या मागण्या काय आहेत?

एलपीजी डिस्ट्रीब्यूटरची मागणी आहे की, 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी. सध्याच्या 75 रुपये प्रति सिलेंडरवरून ते सुमारे 120 ते 150 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढवावे. पेट्रोल आणि डिझेल डीलर्स आपल्या एकूण कमिशनमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी करत आहेत. त्यांची मागणी आहे की, पेट्रोलवर प्रति लिटर 1.50 रुपयांची वाढ करण्यात यावी. तसेच, डिझेलवर प्रति लिटर 2.50 रुपयांची वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याआधी कधी वाढले होते कमिशन दर?

घरगुती एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्सचे कमिशन याआधी शेवटचे ऑक्टोबर 2023 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यावेळी 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवरील कमिशन 64.84 रुपयांवरून 73.08 रुपये करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, 5 किलोच्या लहान सिलेंडरसाठीचे कमिशन 32.42 रुपयांवरून वाढवून 36.54 रुपये प्रति सिलेंडर इतके निश्चित करण्यात आले होते.

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) सुमारे 7 ते 8 वर्षांच्या कालावधीनंतर, 30 ऑक्टोबर 2024 रोजी डीलर मार्जिनमध्ये वाढ केली. त्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल पंप डीलर्सच्या कमिशनमध्ये 1 डिसेंबर 2024 रोजी सुधारणा करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us