
Stock Market News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल दरम्यान शस्त्रसंधी झाल्याचा निर्णय जाहीर केला. इराण आणि इस्त्रायलमध्ये 12 दिवसांपासून सुरु असलेले युद्ध थांबले. त्याचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारात दिसून आले. इराण-इस्त्रायल युद्धामुळे गेले काही दिवस घसरणीवर असलेल्या शेअर बाजाराने मंगळवारी उसळी घेतली. आशिया बाजारापासून डोमेस्टीक स्टॉक मार्केटपर्यंत सर्वत्र उत्साह दिसला. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातही चांगली वाढ झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी 24 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 890 प्वाइंटने वाढला. सेन्सेक्स 82,787.49 वर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीच्या अंकात 255.70 अंकांनी वाढ झाली. निफ्टी 25,227.60 अंकांवर गेला.
स्मॉलकॅप आण मिडकॅप शेअरमध्ये चांगली वाढ दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 900 अंकांनी वाढला. बीएसईपर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल 4.42 लाखाने वाढले. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 10 मिनिटांत 4 लाख कोटीने वाढली. तसेच क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाली.
शेअर बाजारातील तेजीमध्ये, अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. अदानींच्या शेअर्समध्ये 4.43 टक्के वाढ झाली. त्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट 2.42 टक्के, लार्सन अँड टर्बो 2.18 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.11 टक्के आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये 1.65 टक्के वाढ झाली. घसरलेल्या शेअर्समध्ये एनटीपीसी 3.60 टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स 0.63 टक्के तर ट्रेंटचे शेअर्स 0.28 टक्क्यांनी घसरले.
युद्धबंदीच्या घोषणेनंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. गेल्या ट्रेडींग सत्रात ब्रेंट क्रूड फ्युचर्स 5.53 डॉलर म्हणजेच 7.2 टक्क्यांनी घसरून 71.48 डॉलरवर बंद झाले. तसेच अमेरिकी वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड (डब्ल्यूटीआय) 68.51 डॉलरवर बंद झाला. यापूर्वी तज्ज्ञांकडून कच्चा तेलाच्या किंमती 110 डॉलर ते 120 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहचणार असल्याचे म्हटले गेले. परंतु शस्त्रसंधीच्या निर्णयाचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतींवर झाला. त्यात मंगळवारी घसरण झाली.