AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वात मोठी अपडेट

Fuel Price India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भारतातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वात मोठी अपडेट
Donald Trump and Crude Oil PriceImage Credit source: Google
| Updated on: May 29, 2026 | 11:00 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे भारतात गेल्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. मात्र आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून देशातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन सैन्य स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील नाकेबंदी हटवण्यासाठी तयार आहे. जर असे झाले तर भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रम्प नेमके काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘इराणने कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब तयार करण्याचा विचार सोडला पाहिजे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ तातडीने कोणताही कर किंवा अडथळा न ठेवता दोन्ही बाजूंनी जहाज वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल. अमेरिकन नौदलाने त्या भागात टाकण्यात आलेल्या स्फोटक सुरंगांचा नाश केला असून तिथे अडकलेली जहाजे आता सुरक्षितपणे परतू शकतात.’

आता भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. जर होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी पूर्णपणे हटवली गेली, तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, मार्ग खुला झाल्यानंतर जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल. पुरवठा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

दुसरे कारण म्हणजे, युद्धाच्या धोक्यामुळे जहाज वाहतूक विमा आणि मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. नाकेबंदी हटवल्यानंतर हा खर्च कमी होईल आणि भारताला तेल आयात करणे तुलनेने स्वस्त पडेल. तिसरे कारण म्हणजे, ट्रम्प यांच्या विधानातून इराणसोबत चर्चेचा मार्ग खुला होत असल्याचे संकेत मिळत आहेत. जर इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या, तर तेलाच्या किंमती आणखी वेगाने घसरू शकतात. याचा फायदा भारताला होऊ शकतो.

दर लगेच कमी होणार नाहीत

होर्मुझ उघडल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाले म्हणजे भारतात लगेच पेट्रोल-डिझेल स्वस्त होईलच असे नाही. यासाठी सरकारी तेल कंपन्या ही दरकपात सामान्य ग्राहकांपर्यंत किती लवकर पोहोचवतात, यावर सर्व काही अवलंबून असेल. तसेच सरकारने या काळात कर वाढवला नाही, तर येत्या काही दिवसांत नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा