आयुष्यात कधीच लागणार नाही गॅस सिलिंडर; फक्त 5 हजारांमध्ये तयार होईल गॅस फ्री किचन

Gas Free Kitchen : युद्धामुळे भारतात गॅसची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रासाचा सामना करावा लागू शकतो. आज आपण गॅस फ्री किचन कसे तयार करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत.

आयुष्यात कधीच लागणार नाही गॅस सिलिंडर; फक्त 5 हजारांमध्ये तयार होईल गॅस फ्री किचन
Gas Kitchen
Image Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2026 | 5:08 PM

मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुचा पुरवठा खंडित झाला असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये चढ-उतार दिसत आहेत आणि त्याचा परिणाम LPG च्या दरांवरही झाला आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयात करतो, त्यामुळे भारतात गॅस सिलिंडर महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या एलपीजी सिलिंडर 900 रुपयांच्या आसपास मिळत आहे. तर काही ठिकाणी सिलिंडरच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. आज आम्ही तुम्हाला गॅसशिवाय स्वयंपाक कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.

गॅसशिवाय स्वयंपाक कसा करायचा?

गॅस सिलेंडरशिवायही किचनमध्ये प्रवेश करण्याचा विचारही अनेकांच्या डोक्यात आला नसेल. कारण भारतात जवळपास सर्व कुटुंबाचा स्वयंपाक गॅसवर केला जातो. जर एखादे कुटुंब दर महिन्याला एक सिलेंडर वापरत असेल तर वर्षभरात केवळ स्वयंपाकासाठी सुमारे 10 ते 11 हजार इतका खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक गॅसला पर्याय शोधत आहेच. वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक किचन गॅजेट्स हा यावर एक चांगला पर्याय आहे. याचा वापर आपण करू शकतो.

5000 हजारांमध्ये होईल स्वयंपाकाची सोय

  • तुम्ही 5000 च्या बजेटमध्ये एक छोटं गॅस मुक्त किचन तयार कऊ शकता. तुम्ही 1500 ते 2000 रुपयांचे इंडक्शन कुकटॉप खरेदी करू शकता. यात वीजेच्या मदतीने थेट भांडे गरम होते, त्यामुळे उष्णतेचा अपव्यय कमी होतो आणि स्वयंपाक लवकर तयार होतो. हा गॅसला एक चांगला पर्याय आहे.
  • 1200 ते 1800 रुपयांचा इलेक्ट्रिक राइस कुकर किंवा मल्टी कुकर खरेदी करू शकता. यात भात, डाळ, खिचडी आणि विविध प्रकारच्या भाज्या सहज बनवता येतात. हे छोट्या कुटुंबांसाठी किंवा एकटे राहणाऱ्यांसाठी हे खूप उपयोगी ठरते.
  • तुम्ही 500 ते 800 रुपयांची इलेक्ट्रिक केटली खरेदी करू शकता. याचा वापर पाणी उकळण्यासाठी, चहा बनवण्यासाठी किंवा इंस्टंट पदार्थ बनवण्यासाठी होतो. ही तीन उपकरणे मिळून एकूण खर्च सुमारे 3500 ते ₹5000 इतका होतो. म्हणजे एकदाच छोटा खर्च करून गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

वीजबिल वाढणार?

अनेकांच्या मनात प्रश्न असतो की विजेवर स्वयंपाक केल्यास बिल किती वाढेल. भारतातील अनेक राज्यांमध्ये घरगुती विजेचा दर साधारणपणे 4 ते 8 प्रति युनिट दरम्यान असतो. जर 2000 वॅटचा इंडक्शन कुकटॉप रोज सुमारे दोन तास वापरला, तर महिन्याला सुमारे 100 ते 120 युनिट वीज खर्च होऊ शकते. त्यामुळे विजेचे बिल सुमारे 600 ते 900 दरम्यान येऊ शकते. म्हणजेच एका गॅस सिलिंडरला लागणारा पैसा यासाठी खर्च होऊ शकतो.

Follow Us