AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: UPI मधून केव्हा काढता येईल PF, किती काढता येईल रक्कम?

EPFO 3.0 UPI ATM: नोकरदार वर्गाला आती पीएफ काढणे अगदी काही मिनिटांचा खेळ असेल. मोबाईलमधील युपीआय वॉलेटचा वापर करून पैसे वळता करता येईल. तर खास एटीएममधून पीएफचा पैसा काढता येईल. पण कधी सुरू होणार ही सुविधा, काय आहे ती अपडेट?

EPFO: UPI मधून केव्हा काढता येईल PF, किती काढता येईल रक्कम?
ईपीएफओ ३ युपीआय एटीेएमImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 18, 2026 | 9:27 AM
Share

EPFO 3.0 UPI ATM: PF ची रक्कम काढणे ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्जफाटे करावे लागतात. इतके करूनही रक्कम तातडीने हाती येईल असे नाही. त्यासाठी 15 दिवस ते त्यापेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो. पण आता हा लवकरच सर्व इतिहास असेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) डिजिटल पाऊल टाकले आहे. त्याला ईपीएफओने ‘EPFO 3.0’ असे नाव दिले आहे. या नवीन व्यवस्थेतंर्गत पीएफ खातेदारांना आता सहज पीएफ काढता येईल. पीएफ खात्यातून रक्कम थेट एटीएम (ATM) अथवा युपीआयच्या (UPI)माध्यमातून काढता येईल.

PF काढण्यासाठी नवीन डिजिटल क्रांती

ईपीएफओचा मुख्य उद्देश हा संपूर्ण सिस्टिम लवकरात लवकर डिजिटल करणे हा आहे. या दिशेने ‘EPFO 3.0’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अपग्रेडनंतर खातेदारांना बँकिंग सारख्या जलद सुविधा मिळतील. त्यांना पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज फाटे करावे लागणार नाहीत. तर पीएफ खात्यातून काढण्यासाठी मंजूरीची गरज नसेल. ही नवीन व्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार होती. पण तांत्रिक बाबी तपासण्यात आणि प्रायोगिक तत्वावर त्याची चाचणी करण्यासाठी वेळ घेण्यात आला आहे.

PF ATM Card, UPI च्या माध्यमातून असा काढा पैसा

पीएफ खात्याशी संबंधित सर्वच सेवा डिजिटल होतील. ईपीएफओ खातेदारांसाठी एक विशेष PF ATM Card आणण्याच्या विचारात आहे. हे एटीएम कार्ड इतर डेबिट कार्डसारखेच असेल तुमच्या जवळच्या एटीएम मशीनवर जाऊन तुमच्या गरजेनुसार आणि नियमानुसार तुम्हाला पीएफ रक्कम काढता येईल. तर पीएफ खाते हे युपीआय खात्यांशी (UPI) जोडले जाणार आहे. तर ईपीएफओ पोर्टल आणि उमंग (UMANG) ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसा हस्तांतरीत करणे अधिक सोपे होईल.

तर या खात्यातून किती रक्कम एटीएम आणि युपीआय सेवेद्वारे काढता येतील याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, ईपीएफओ एटीएम वा युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढण्यासाठी एक निश्चित मर्यादा ठरवेल. सध्याच्या माहितीनुसार, खात्यातील एकूण रक्कमेच्या 50 ते 75 टक्के रक्कम या माध्यमातून काढता येईल. तर भविष्यात यामध्ये अजून काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती ईपीएफओ जाहीर करेल.

केव्हा सुरू होईल ही सुविधा

EPFO 3.0 या एप्रिल अथवा पुढील मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता होती. पण सध्या अजूनही काही तांत्रिक चाचण्या बाकी असल्याने आणि सुरक्षित पेमेंट प्रणालीसाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तर यासाठी मोबाईलवर नवीन EPFO 3.0 ॲप्लिकेशन येण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खातेदारांना क्यूआर कोडच्या मदतीने सहज रक्कम काढता येईल. तसेच एटीएमवरही क्यूआर कोड स्कॅन करून रक्कम काढता येईल.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?