EPFO : स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! ईपीएफओचे भन्नाट फीचर, सर्वच काम एका क्लिकवर, PF विषयी मोठी अपडेट

EPFO Service History: नोकरी सोडल्यानंतर अनेकांना पीएफ खात्याचा विसर पडतो. अनेकदा खाते लिंक करण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी आता ईपीएफओने एक भन्नाट फीचर आणले आहे. पीएफविषयी मोठी अपडेट समोर आणली आहे. त्यामुळे तुमचे पीएफ खाते विसरले असेल तरी एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळेल.

EPFO : स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! ईपीएफओचे भन्नाट फीचर, सर्वच काम एका क्लिकवर, PF विषयी मोठी अपडेट
ईपीएफओ सेवा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 2:35 PM

खासगी क्षेत्रात नोकरी बदल हे काही नवल नाही. नोकरी बदलल्यानंतर अनेकदा नवीन पीएफ सदस्य ID मिळते. आता पीएफ व्यवस्थापनासाठी युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) सुरू करण्यात आला आहे. पण जुन्या पीएफ खात्याची माहिती अनेकदा मिळत नव्हती. UAN अनिवार्य होण्यापूर्वीच्या पीएफ खात्याची माहिती मिळत नव्हती. अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पीएफ खात्याची माहिती घ्यायची असेल तर खूप कसरत करावी लागत होती. त्यांना कागदी घोडे नाचवावे लागत होते. तरीही पीएफ खात्यातील रक्कम मिळण्याची खात्री नव्हतीच. आता केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व्हिसी हिस्ट्री (Service History) नावाचे फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मागील नोकरीतील पीएफ रेकॉर्ड सदस्यांना दिसतील.

नवीन फीचरचे फायदे

या फीचरच्या माध्यमातून जुने दस्तावेज शोधण्याऐवजी मागील सर्व्हिस रेकॉर्ड एकाच ठिकाणी एकाच वेळी दिसेल. अनेकांना हे अगदी सामान्य अपडेट वाटेल, पण अनेक कर्मचाऱ्यांसाठी हे फीचर महत्त्वाचे आहे. अनेकदा कर्मचारी नोकरी सोडून गेल्यावर त्याची तारीख अपडेट होत नाही. काही प्रकरणात पीएफ खाते UAN शी लिंक नसल्याचे दिसते. तर अनेकांचे जुन्या पीएफ खात्यातील पैसे तसेच अडकून पडलेले आहेत. त्यांच्यासाठी हे फीचर वरदानच ठरले आहे.

सर्व्हिसी हिस्ट्री तपासल्यानंतर तुमच्या खात्यातील त्रुटी लागलीच, चटकन लक्षात येतील. जर जुनी कंपनी त्या यादीत नसेल अथवा नोकरी सोडल्यानंतरची तारीख अपडेट झालेली नसेल तर तुम्ही जुन्या कंपनीतील एचआरसोबत ही माहिती शेअर करून त्रुटी दूर करू शकता. कंपनीने तुमचा रेकॉर्ड अपडेट केल्यास हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

PF हस्तांतरण होईल सोपे

ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक UAN आहे, त्यांना हे फीचर फायद्याचे ठरू शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे संपूर्ण करिअरमध्ये आता एकच UAN असणे गरजेचे आहे. पण काही प्रकरणात नोकरी बदलल्यावर डुप्लिकेट UAN झाले होते. सर्व्हिस हिस्ट्रीमुळे तुमच्या मागील सर्व कंपन्यांची हिस्ट्री समोर येईल. तर जुन्या पेन्शन खात्यातील पीएफ रक्कम शिल्लक असेल तर त्याची माहिती मिळेल आणि ही रक्कम हस्तांतरीत करणे सोपे जाईल.

कसा करणार वापर?

हे फीचर EPFO ​​सदस्य ई-सेवा पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. त्यासाठी संबंधित पोर्टलवर जा

UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा

त्यानंतर ‘View’ टॅबवर क्लिक करा

आता ‘Service History’ निवडा

या पेजवर EPFO ​​कडे नोंदणी असलेल्या तुमच्या कंपनीची माहिती दिसेल

यामध्ये कंपनीचे नाव, त्यांचा आयडी, नोकरी सुरू केल्याची आणि सोडल्याची तारीख दिसेल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us