SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

| Updated on: Feb 15, 2021 | 8:22 AM

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी इंटरनेट स्कॅमर्सनं भरलेलं आहे. यामुळे फेक जॉब ऑफर टाळा, असा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे.

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून असे राहा सावध
Follow us on

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India-SBI) नोकरीच्या शोधात (job search) असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना आणि अलर्ट जारी केला आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी इंटरनेट स्कॅमर्सनं भरलेलं आहे. यामुळे फेक जॉब ऑफर टाळा, असा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे. अशा स्मॅकर्सना टाळण्यासाठी बँकेने सेफगार्ड्स म्हणून काही उपायही सांगितले आहेत. (fake jobs and instant loan sbi alert fake job offers claiming to be from reputed organization)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत असा काही धोका झाला तर Https://cybercrime.gov.in वर सायबर क्राईम नोंदवायला हवा, असं बँकेने म्हटलं आहे. SBI ने ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे.

एसबीआयने त्यांच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर नोकरी शोधणाऱ्यांना गंडा घालणारे अनेक स्कॅमर्स अॅक्टिव्हेट आहेत. यामुळे फेक जॉबसाठी फोन आल्यास आपली माहिती देणं टाळा. हल्ली अनेक खोट्या नोकऱ्या आणि ऑफर्स दिले जात आहेत. पण यातून ग्राहकांची खासगी माहिती मिळवून फसवणुकीचं काम सुरू आहे. हे ऑनलाइन फसवणूकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, अनेक बँका नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देत आहेत.

फेक नोकरीच्या ऑफरपासून कसे वाचाल

– सगळ्यात आधी नोकरीच्या ऑफरची सत्यता तपासा, कंपनीची माहिती अधिकृतरित्या असणं महत्त्वाचं आहे.

– नोकरी देणाऱ्या कंपनी / अधिकाऱ्यांची क्रेडेन्शियल्स पडताळणी करा.

– नोकरीचे वचन देणाऱ्या व्यक्तीकडे तुमचे वैयक्तिक तपशील किंवा कोणताही निधी पाठवू नका.

– कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा.

– लक्षात असुद्या कोणतीही कंपनी किंवा अधिकारी उमेदवारांकडून आगाऊ फी / देणगी / निधी विचारत नाहीत.

असे अॅप नका करू डाऊनलोड

एसबीआयने लाखो ग्राहकांना इंस्टंट कर्ज देणाऱ्या कर्जाचे अॅप्स सांभाळून वापरण्याची सक्त ताकीद दिली आहे. एसबीआयने असं म्हटलं आहे की, त्यांनी अशा कुठल्याही माहितीवर क्लिक करू नये ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल. आधी कंपनीसंबंधी आणि ऑफर संबंधी अधिकृत माहिती मिळवा आणि त्यानंतर कर्जाविषयी पुढे प्रोसेस करा असं बँकेनं म्हटलं आहे.

बाजारात मोठ्या प्रामाणात आलेल्या मोबाईल लँडिंग अ‍ॅप्समुळे बँकिंग रेगुलेटर देखील हैराण आहेत. त्यांना अद्याप या अ‍ॅप्समुळे लोकांना किती पैसे देण्यात आले आहेत याबाबत कुठलीही माहिती नाही. सोबतच, RBI ने बेकायदेशीर अ‍ॅप्सला अ‍ॅप स्टोर्सवरुन हटवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नुकतंच पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या अनेक तक्रारींमुळे अवैध अ‍ॅप्सची कार्य प्रणालीबाबत माहिती पुढे आली आहे. हे अ‍ॅप्स शेअर कंपन्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मोठी रक्कम बाजरात गुंतवतात. हे गरजू लोकांना काहीही गहाण न ठेवता तात्काळ लहान कर्ज उपलब्ध करवून देतात. पण, त्यासाठी ग्राहकाच्या फोनचा लोकेशन डाटा आणि कॉन्टॅक्ट लिस्टची परवानगी घेतली जाते. काही अ‍ॅप्सने ग्राहकांच्या आधार कार्डची प्रतही मागितली होती.

या अ‍ॅप्सवर असणार नजर

मायबँक, वनहोप कॅशबी, कॅशालो, रुपीफॅक्टर, ओकेकॅश, रुपीबाजार, पैसालोन,एमरुपी, फ्लिप कॅश, आयरुपी, अँट कॅश, रुपीबॉक्स, झिरोकॅश, कॅशकाउ, मनीमोर, कोआला कॅश, स्टार लोन, गेट-अ-कॅश, युरुपी, योयो कॅश. (fake jobs and instant loan sbi alert fake job offers claiming to be from reputed organization)

संबंधित बातम्या –

GST चोरी करताना पकडले गेलात तर रजिस्ट्रेशन रद्द होणार!

SBI Free Accidental Insurance: तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरता, स्टेट बँकेकडून 20 लाखापर्यंत मोफत अपघात विमा, वाचा सविस्तर

मुंबईपासून ‘या’ 4 शहरांमध्ये सेवा देणार खासगी Tejas Express, जाणून घ्या वेळापत्र

Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

(fake jobs and instant loan sbi alert fake job offers claiming to be from reputed organization)