FD Rates: छोट्या की मोठ्या बँका, एक लाख रकमेवर पाच वर्षांत कुठे मिळेल जास्त पैसा ?

जर तुम्ही पाच वर्षांसाठी एफडीमध्ये एक लाख रुपये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर वेगवेगळ्या बँकांकडून दिले जाणारे व्याजदर पाहूनच गुंतवणूकीचा निर्णय घ्या. मोठ्या बँकांहून काही स्मॉल फायनान्स बँका सर्वाधिक व्याजदर देत आहेत.

FD Rates: छोट्या की मोठ्या बँका, एक लाख रकमेवर पाच वर्षांत कुठे मिळेल जास्त पैसा ?
fd news
| Updated on: Nov 27, 2026 | 10:31 PM

जर तुम्हाला शेअर बाजाराच्या जोखीमेशिवाय तुमचा पैसा वाढवायचा असेल तर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) एक चांगला पर्याय होऊ शकतो. यात गुंतवणूकीच्या वेळी व्याजाचे दर निश्चित केले जाते आणि त्याच हिशेबाने परतावा मिळतो. परंतू बँकेचे व्याजदर काही सारखे नसते. अशा एक लाख रुपये पाच वर्षांसाठी जमा करण्याआधी हे पाहणे गरजेचे आहे की कोणती बँक किती व्याज देत आहे. छोट्या फायनान्स बँका या समयी मोठ्या बँकांच्या तुलनेत जास्त व्याज देत आहेत.

 

Loading...

२५ नोव्हेंबर २०२६ च्या पैसाबाजारच्या आकडेवारीनुसार सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक पाच वर्षांच्या FD वर सर्वात जास्त ८.२५ टक्के वार्षिक व्याज देत आहे. तर एसबीआय या काळासाठी ६.०५ टक्के व्याज देत आहे.

एक लाख रुपयांवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा ?

जर तुम्ही एक लाख रुपयांची एफडी पाच वर्षांसाठी लावली आणि व्याज तिमाहीआधारावर वाढले गेले तर अंदाजित रक्कम या प्रकारे वाढू शकते.

छोट्या फायनान्स बँक देत आहेत  जास्त व्याज

बँकचे नाव वार्षिक व्याजदरपाच वर्षांतील अंदाजे रक्कम
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक8.25%1,50,426
जन स्मॉल फायनान्स बँक7.77% 1,46,928
DCB बँक 7.50%1,44,995
HDFC बँक 6.60%1,38,723
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6.50%1,38,042
SBI 6.05%1,35,018

स्मॉल फायनान्स बँकेपैकी सुर्योदय बँक ८.२५ टक्के व्याजासह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक ७.७७ टक्के, उज्जीवन ७.२०, इक्विटास ७ टक्के आणि एयु स्मॉल फायनान्स बँक ६.७५ टक्के व्याज देत आहेत. प्रायव्हेट बँकेत DCB ७.५० टक्के व्याज देत आहे. सरकारी बँकात सेंट्रल बँक ऑफ इंडिया ६.५० टक्के आणि एसबीआय ६.०५ टक्के व्याज देत आहे.

एफडी करण्याआधी कोणती काळजी घ्यावी ?

जर तुम्ही एफडी करत असाल तर केवळ जास्त व्याज दर पाहून बँक निवडू नये. कारण DICGC अंतर्गत एक जमाकर्त्याची एकूण जमा रक्कम आणि व्याज मिळून कमाल ५ लाखपर्यंतचा विमा मिळतो. याशिवाय वेळे आधी एफडी तोडल्यानंतर लागणारा दंड आणि व्याजावरील कराच्या नियमांचाही अभ्यास करावा.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us