मर्सिडीज बेंझने केली SBI सोबत भागीदारी, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फायदे

| Updated on: Nov 24, 2020 | 8:26 PM

मर्सिडीज बेंझ इंडियाला एसबीआयच्या एचएनआय ग्राहकच्या आधारे अेक बाजारामध्ये प्रवेश मिळणार आहे.

मर्सिडीज बेंझने केली SBI सोबत भागीदारी, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फायदे
Follow us on

नवी दिल्ली : लक्झरी कार निर्माती मर्सिडीज बेंझने (Mercedes-benz) स्टेट बँक ऑफ इंडियाशी (State Bank of India) भागीदारी केली आहे. यामध्ये ‘आकर्षक’ व्याज दर आणि इतर अनेक फायद्यांसह कंपनीने ही भागीदारी केली आहे. मर्सिडीज बेंझ इंडियाला एसबीआयच्या एचएनआय ग्राहकच्या आधारे अेक बाजारामध्ये प्रवेश मिळणार आहे. इतकंच नाही तर बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या लक्झरी कार्सच्या बुकिंगवर अनेक फायदे मिळणार आहेत. (for car finance mercedes benz ties up with state bank of india)

या करारामध्ये आकर्षक व्याजदरासह अनेक आर्थिक फायद्यांची हमी देण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर एसबीआयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म योनोमार्फत मर्सिडीज बेंझ कार ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या त्यांच्या सर्व ग्राहकांना डिलरशिपवर 25,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. यामुळे कार प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, “मर्सिडीज-बेंझ हा ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच नव्या आयडीया काढत असते. यामुळे कंपनीने पहिल्यांदाच एखाद्या बँकेशी करार केला आहे. यामध्ये ग्राहकांच्या फायद्याला आणि सुविधेला प्रथम प्राधान्य देण्यात आलं आहे.

या भागीदारीच्या कराराअंतर्गत एचबीआय HNI (high net-worth individuals) ग्राहकांचा एसबीआयमध्ये सहभागी करण्यात येईल. एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस सेटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक आपल्या ग्राहकांपर्यंत जास्त नफा मिळवून देण्याच्या तयारीत आहे. ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ही सगळ्यात खास ऑफर असणार आहे.

इतर बातम्या –

अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्री

तुमच्या खात्याला आजच बदला जनधन खात्यामध्ये, होईल लाखोंचा फायदा

(for car finance mercedes benz ties up with state bank of india)