AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर सोने पुन्हा चमकले, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?

Gold Silver Price Today News | सणाच्या मुहुर्तावर गेल्या दोन दिवसांपासून सोने चमकले आहे. गुरुवारी सोने घसरले होते. शुक्रवार आणि शनिवारी सोन्याने अनुक्रमे 400, 440 रुपयांचा दरमजल गाठत ही घसरण भरून काढली. रविवारी सोन्याचे दर स्थिर होते.

Gold Silver Price Today News | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर सोने पुन्हा चमकले, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?
आजचे सोन्या चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 14, 2022 | 2:53 PM
Share

Gold Silver Price Today News | सणाच्या मुहुर्तावर गेल्या दोन दिवसांपासून सोने चमकले आहे. गुरुवारी सोने घसरले होते. शुक्रवार आणि शनिवारी सोन्याने अनुक्रमे 400, 440 रुपयांचा दरमजल गाठत ही घसरण भरून काढली. रविवारी सोन्याचे दर स्थिर होते. सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) गेल्या दोन दिवसांत 880 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी चांदी 400 रुपयांनी घसरली होती. ही घसरण चांदीने शनिवारी वसूल केली. आज रविवारी 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर चांदी चांदी 800 रुपयांनी वधरलेली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,750 रुपये होता, रविवारी हाच भाव 10 ग्रॅमसाठी 48,150 रुपये आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,530 रुपये मोजावे लागणार आहे. चांदी रविवारी 59,300 रुपये आहे. शनिवारी हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) होता.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,150 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,530 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 585 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा