AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | दोनच दिवसांत सोने 800 रुपयांनी वधरले, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?

Gold Silver Price Today News | गुरुवारी किंमतीत झालेली घसरण आज सोन्याने पुन्हा भरुन काढली. सोन्याच्या किंमतीत आज प्रति 10 ग्रॅम 880 रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Price Today News | दोनच दिवसांत सोने 800 रुपयांनी वधरले, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?
800 रुपयांची वाढImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 13, 2022 | 12:25 PM
Share

Gold Silver Price Today News | आज शनिवारी, 13 ऑगस्ट 2022 रोजी सोने पुन्हा चमकले. सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) 880 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी चांदी 400 रुपयांनी घसरली होती. ही घसरण चांदीने वसूल केली. आज शनिवारी चांदी 800 रुपयांनी वधरली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव काल 47,750 रुपये होता, आज हाच भाव 10 ग्रॅमसाठी 48,150 रुपये आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा कालचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,530 रुपये मोजावे लागणार आहे. चांदी आज 59,300 रुपये आहे. काल हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) होता.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,150 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,530 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 585 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.