AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today News | अमेरिकन बँकेच्या व्याजदर वाढीचे संकेत, काय होणार परिणाम? सोन्याच्या दरात वाढ , काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?

Gold Silver Price Today News | काल किंमतीत झालेली घसरण आज सोन्याने भरुन काढली. सोन्याच्या किंमतीत आज प्रति 10 ग्रॅम 440 रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Price Today News | अमेरिकन बँकेच्या व्याजदर वाढीचे संकेत, काय होणार परिणाम? सोन्याच्या दरात वाढ , काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?
आजचे सोन्या चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 12, 2022 | 12:20 PM
Share

Gold Silver Price Today News | आज शुक्रवारी सोने चमकले. सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) 400 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 400 रुपयांनी घसरली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX NSE वर सोन्याच्या दरात 0.48% वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 47,750 रुपये आहे, काल हाच भाव 10 ग्रॅमसाठी 47,350 रुपये होता. तर चांदीचा दर 400 रुपयांनी घसरला. चांदी आज 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) झाली आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,750 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,090 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,090 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 585 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?