AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Controversy : स्वतः देवाचा अवतार असल्यासारखं..’रामायण’ सिनेमावर टीका करणाऱ्या कलाकारांवर लेखकाचा संताप

रामानंद सागर यांच्या लोकप्रिय रामायण मालिकेत काम केलेल्या कलाकारांनीही रामायण सिनेमातील कलाकारांची निवड, वेशभूषा आणि काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता लेखक आणि गीतकार वरूण ग्रोव्हर याने याच कलाकारांवर निशाणा साधला आहे.

Ramayana Controversy  : स्वतः देवाचा अवतार असल्यासारखं..'रामायण' सिनेमावर टीका करणाऱ्या कलाकारांवर लेखकाचा संताप
| Updated on: Nov 13, 2026 | 7:04 PM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक कलाकरांनी त्यावर आपली मतं मांडली आहेत. विशेष म्हणजे, रामानंद सागर यांच्या लोकप्रिय रामायण मालिकेत काम केलेल्या कलाकारांनीही रामायण सिनेमातील कलाकारांची निवड, वेशभूषा आणि काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता लेखक आणि गीतकार वरूण ग्रोव्हर यांना याच कलाकारांवर निशाणा साधला आहे.

वरूण ग्रोव्हर संतापले, म्हणाले…

वरूण ग्रोव्हर यांनी 12 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं, रामानंद सागर यांच्या रामायणातील कलाकार नव्या चित्रपटाबद्दल अशी काय टिप्पणी टिका करत आहेत, जणू काही ते स्वत: त्या देवांचा अवतार आहेत. त्यांच्या या पोस्टचा रोख जुन्या रामायण मालिकेतील कलाकारांच्या नव्या चित्रपटावरील प्रतिक्रियांकडे होता. विशेषत: सुनील लहरी ( जुन्या रामायण मालिकेतील लक्ष्मण) आणि दिपीका चिखलीया ( जुन्या रामायण मालिकेतील सीता ) यांनी या चित्रपटाबद्दल व्यक्त केलेल्या मतांची सध्या चर्चा होत आहे.

सुनील लहरी यांनी कोणत्या गोष्टींवर टिका केली

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी रणबीर कपूरच्या नव्या ‘रामायण’ चित्रपटाचा आढावा घेतला होता. त्यांनी चित्रपटातील भव्य दृश्य, VFX आणि कलाकारंच्या अभिनयाचं कौतुक केलं. मात्र, चित्रपटात भक्तिभाव आणि दिव्यतेची कमतरता असल्याचं त्यांचं मत होतं.

चित्रपटातील काही महत्त्वाचे प्रसंग योग्य प्रकारे दाखवले नसल्याचंही त्यांनी सांगितलं. परशुरामाचा प्रसंग कमकुवत वाटल्याचं, तर अहिल्येचा प्रसंग चित्रपटात नसल्याचं त्यांनी नमूद केलं. याशिवाय शूर्पनखा ज्याप्रकारे सीतेशी संवाद साधतात यावरही आक्षेप व्यक्त केला. रावणाच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

दिपीका चिखलिया यांनी साई पल्लवीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते

दिपीका चिखलिया यांनी व्हरायटी ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी साई पल्लवी उत्तम अभिनेत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र ती सीतेच्या भूमिकेत कशी दिसेल याबद्दल निश्चित नसल्याचंही म्हटलं होतं. दीपीका यांच्या मते दूरदर्शनवरील रामायण मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे चित्रपटाची आणि मालिकेची तुलना होणं स्वाभाविक आहे. दरम्यान लेखक वरूण ग्रोवर यांच्या पोस्टमुळे जुन्या रामायण मधील कलाकारांच्या प्रतिक्रिया आणि नव्या चित्रपटावर सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप