AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, अक्षय्य तृतीयेनंतर उलटफेर; आज सोन्याचे भाव…

अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर दिसून आला आहे. आदल्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर होते, पण आता खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊया.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, अक्षय्य तृतीयेनंतर उलटफेर; आज सोन्याचे भाव...
| Updated on: Apr 20, 2026 | 8:45 AM
Share

Gold Rate Today In India : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया काल होती, या दिवशी सोनं आवर्जून खरेदी केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बरीच खरेदी झाली, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असूनही नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून थोडूफार खरेदी केली. मात्र आता अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी सराफा बाजारात मोठा उलटफेर दिसून आला. सोन्याची चमक थोडी फिकी पडल्याचे दिसत असून चांदीही कमकुवत झाली आहे.

एक दिवसाच्या स्थिरतेनंतर राजधानी दिल्लीमध्ये 24 व 22 कॅरेटचं सोनं प्रति 10 ग्रॅमसाठी 10 रुपयांनी स्वस्त झालं. आदल्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर होते, आणि त्याच्या आदल्या दिवशी, 19 एप्रिल रोजी, 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी, तर 22कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी वाढ झाली होती. आता, दिवसभराच्या स्थिरतेनंतर, दिल्लीत चांदी स्वस्त झाली असून, तिच्या प्रति किलोग्रॅम दरात 100 रुपयांची घट झाली आहे.

प्रमुख शहरांत किती रुपयांना मिळतंय सोनं ?

चला, देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घेऊया.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर   22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर    18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  
दिल्ली ₹1,55,920 ₹1,42,940 ₹1,16,980
मुंबई ₹1,55,770 ₹1,42,790 ₹1,16,830
कोलकाता ₹1,55,770 ₹1,42,790 ₹1,16,830
चेन्नई ₹1,56,650 ₹1,43,590 ₹1,19,790
बंगळुरू ₹1,55,770 ₹1,42,790 ₹1,16,830
हैदराबाद ₹1,55,770 ₹1,42,790 ₹1,16,830
लखनऊ ₹1,55,920 ₹1,42,940 ₹1,16,980
पाटणा ₹1,55,820 ₹1,42,840 ₹1,16,880
जयपुर ₹1,55,920 ₹1,42,940 ₹1,16,980
अहमदाबाद ₹1,55,820 ₹1,42,840 ₹1,16,880

चांदीची घसरण 

यापूर्वी, 17 एप्रिल रोजी एक किलो चांदी 50000 रुपयांनी स्वस्त झाली आणि त्यानंतर 18 एप्रिल रोजी ती 10,000 रुपयांनी महाग झाली. यानंतर, काल म्हणजेच 19 एप्रिल रोजी, अक्षय तृतीयेला, चांदीचा भाव स्थिर राहिला आणि आज दिल्लीत ती 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 75 हजार 900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचे तेच दर आहेत. मात्र, चेन्नईमध्ये चांदी महाग असून तिथे एक किलो चांदीचा भाव 2,79,900 रुपये आहे, म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

पुढे कशी असेल सोन्या-चांदीची चाल ?

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि प्रमुख देशांमधील आर्थिक आकडेवारीवरून बाजारातील तेजी कायम राहील की किंचित मंदावेल, हे ठरेल. 20 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात, व्यापारी कच्च्या तेलाच्या किमती आणि किरकोळ विक्री, गृहनिर्माण आकडेवारी व ग्राहक भावना यांसारख्या अमेरिकेच्या प्रमुख आकडेवारीवर विशेष बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि ब्रिटनमधील उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमधील PMI आकडेवारीदेखील बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...