AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने-चांदीच्या दरात सलग तिसर्‍या दिवशीही घसरण, तोळ्याचा दर किती?

गेल्या तीन दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 1800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

सोने-चांदीच्या दरात सलग तिसर्‍या दिवशीही घसरण, तोळ्याचा दर किती?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 25, 2020 | 6:14 PM
Share

मुंबई : भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सलग तिसर्‍या दिवशीही घसरण सुरु आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रतितोळा 0.21 टक्क्यांनी घसरुन 48 हजार 585 रुपयांवर गेले आहेत. तर चांदीचा भाव प्रति किलो 59 हजार 460 रुपयांपर्यंत घसरला आहे. गेल्या तीन दिवसांत भारतात सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 1800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. (Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)

सोन्याचे दर सोमवारी प्रतितोळा 900 रुपये, तर मंगळवारी 750 रुपयांनी घसरले होते. तर चांदीचे दर सोमवारी प्रतिकिलो 800 आणि मंगळवारी 1,600 रुपयांनी कमी झाले होते. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 17 जुलैपासूनची सर्वात नीचांकी पातळीवर आहेत.

कोरोना लशीबाबत गुड न्यूज आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरता कमी झाल्याच्या बातमीमुळे सोने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी औपचारिकरित्या सत्तांतरण मंजूर केले. त्याचप्रमाणे संभाव्य कोव्हिड19 लसीबाबत सकारात्मक घडामोडींनंतर वॉल स्ट्रीटवर (न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज) उसळी पाहायला मिळाली. आशियाई बाजारपेठेवरही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

यापूर्वी 9 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट कॉमेक्सवरील सोन्याच्या किमती एका दिवसात सुमारे 100 डॉलर्स म्हणजेच पाच टक्क्यांनी घसरल्या. त्यावेळीसुद्धा कोरोना लसीच्या प्रगतीच्या बातमीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाली होती.

कोरोना युगात सोने महागले

जगभरातील कोरोनाचा वाढता धोका रोखण्यासाठी उपाय म्हणून लॉकडाऊन, आर्थिक हालचालींवर निर्बंध लादण्यात आले. त्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून स्वीकारले, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. कॉमेक्सवरील सोन्याची किंमत प्रति औंस 2,089 डॉलर इतकी ऐतिहासिक उच्च पातळीवर गेली होती आणि 7 ऑगस्टला भारतातील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांवर गेली होती. (Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)

संबंधित बातम्या

कोरोना लसीच्या बातमीनं सोने दरात घसरण, 5 दिवसांत सोने किती रुपयांनी घसरलं?

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स

(Gold prices fall again down by Rs 1800 in 3 days)

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...