AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्यात धूम धडाम! 1 लाखांपेक्षा खाली येणार? ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता

Gold Market : सोन्यातील दरवाढीचे वादळ शमले आहे. विक्रमी उंचीवरून सोने घसरून 10 ग्रमचा भाव 1.21 लाखांवर आला आहे. जागतिक बाजारात सोने 6 टक्क्यांनी घसरले आहे. सोने एक लाखांच्या आत येणार का?

Gold Rate : सोन्यात धूम धडाम! 1 लाखांपेक्षा खाली येणार? ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता
सोने झाले स्वस्त
| Updated on: Oct 26, 2025 | 11:58 AM
Share

Gold Rate Down : सणासुदीच्या कालात सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी दिसली. पण हे वादळ आता शमल्याचे दिसते. सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. सोन्याने एका मागून एक नवीन विक्रम नावावर केले. पण अचानक सोने 11 हजारांनी आपटले. सोने 1.32 लाखांहून थेट 1.21 लाखांपर्यंत खाली घसरले. ही घसरण अशीच कायम राहणार का असा सवाल विचारल्या जात आहे. जर असे झाले तर सोने एक लाखांपेक्षा खाली उतरणार आणि मोठी स्वस्ताई येणार अशी विचारणा करण्यात येत आहे. काय आहे त्यामागील सत्यता?

दिवाळीनंतर का झाले सोने स्वस्त?

सोने सणासुदीत गगनाला भिडले. किंमती आता दीड लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. पण दिवाळी पाडवा येताच सोन्यात पडझडीला सुरुवात झाली. त्यासाठी अनेक कारणे समोर आलीत. Profit Booking मुळे अनेकांना सोने स्वस्त असतानाच अनेकांनी ते खरेदी केले आणि किंमती गगनाला भिडताच ते विक्रीसाठी बाजारात आणले. त्याचा परिणाम थेट किंमतींवर झाला. सोन्याची बाजारातील आवाक वाढताच भाव घसरले.

सोन्याचा तोरा उतरण्याचे दुसरे कारण म्हणजे डॉलर मजबूत झाला. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर घसरत होता. पण जेव्हा डॉलर मजबूत झाला. तेव्हा इतर देशांनी डॉलर मजबूत होताच सोन्याची खरेदी कमी केली. गुंतवणूकदारांनी सोन्याकडून डॉलरकडे मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याची किंमत अजून घसरली.

सोने घसरणीचे तिसरे कारण म्हणजे मागणी घसरली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA), धनत्रयोदिशी आणि दिवाळीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. आता बाजारात मोठी गर्दी नाही. सणासुदीला मागणी घटल्याने किंमती दबावाखाली आल्या आणि सोने स्वस्त झाले.

सोने 1 लाखांपेक्षा स्वस्त होणार?

सोन्यातील ही घसरण अशीच कायम राहणार का, असा सवाल करण्यात येत आहे. अनेकांना सोने 1 लाखांच्या खाली उतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हे एक टेक्निकल करेक्शन आहे. जेव्हा एखादी वस्तू महाग होते. तेव्हा त्यात थोडी घसरण येणे ही बाब स्वाभाविक आहे. बाजाराला एका दरापर्यंत स्थिर करण्याचा हा प्रयत्न असतो.

तज्ज्ञांच्या मते सोने एकदम खाली येण्याची शक्यता कमीच आहे. सध्या सोन्याचा भाव कमी आहे. तोपर्यंत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. पण येणारा काळ हा लग्न सोहळ्यांचा आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कारण या काळात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सोने जोपर्यंत गडगडत नाही तोपर्यंत ते एक लाखांच्या खाली उतरेल असे सांगता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...