Gold Rate Prediction : बाब्बो… 10 ग्रॅम सोनं 2.38 लाखावर जाणार? एका भविष्यवाणीने सर्वांचीच झोप उडाली, मोठा भूकंप?

सोन्याचे दर नुकतेच घसरले असले तरी, अर्थतज्ज्ञ अलेस्टर मॅकलॉड यांनी येत्या सहा महिन्यांत सोने 2.38 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल अशी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे ही वाढ अपेक्षित आहे, असे ते म्हणतात. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून, पारंपरिक समजुतींना छेद देत त्यांनी प्रत्यक्ष सोने जवळ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

| Updated on: Nov 27, 2026 | 6:38 PM
1 / 8
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने घसरताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातील दोन चार दिवसांचा अपवाद वगळता ही घसरण सुरूच आहे. त्यामुळे ग्राहकांची बल्लेबल्ले झाली आहे. गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी दणक्यात सोने खरेदी केली आहे. मात्र, आता एक भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणी नुसार येत्या काही काळात सराफा बाजारात मोठा भूकंप होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने घसरताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातील दोन चार दिवसांचा अपवाद वगळता ही घसरण सुरूच आहे. त्यामुळे ग्राहकांची बल्लेबल्ले झाली आहे. गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी दणक्यात सोने खरेदी केली आहे. मात्र, आता एक भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणी नुसार येत्या काही काळात सराफा बाजारात मोठा भूकंप होणार आहे.

2 / 8

आर्थिक अनिश्चिततेमुळे सेफ हेवन म्हणून ओळखलं जाणारं सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरताना दिसत आहेत. मात्र, ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचा भाव येत्या सहा महिन्यात 8,000 डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर जाणार आहे. रुपयामध्ये याचा हिशोब केला तर येत्या सहा महिन्यात 10 ग्रॅम सोनं जवळपास 2.38 लाख रुपयांवर जाणार आहे.

3 / 8

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि फायनान्शियल अॅनालिस्ट अलेस्टर मॅकलॉड यांनी ही आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, येत्या सहा महिन्यात सोनं 2.38 लाख रुपयांवर जाणार आहे. बुलियन वोल्टच्या आकड्यानुसार, सोनं 3,580.57 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे.

4 / 8

MINING.COMचे प्रोग्राम टॉप ऑफ माइनमध्ये होस्ट देवन मुरूगन यांच्यासोबत चर्चा कताना मेकलियोड यांनी एक मोठा भ्रम तोडण्याचं काम केलं आहे. सामान्यपणे सोन्याचे भाव ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्यामुळे लोकांना वाटतं या धातूची किंमत वाढली आहे. ही वाढ सोन्याच्या किमतीतील प्रत्यक्ष वाढीपेक्षा अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणाचे अधिक प्रतिबिंब आहे, असं मॅकलॉड यांनी म्हटलं आहे.

5 / 8

बहुतेक गुंतवणूकदार या मूलभूत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा एखाद्या चलनाची क्रयशक्ती कमी होते, तेव्हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सोने हा सर्वात विश्वसनीय मार्ग म्हणून समोर येतो, अशी माहितीही मॅकलॉड यांनी दिली.

6 / 8

अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवते तेव्हा सोनं स्वस्त होतं, असा बराच काळापासूनचा समज आहे. त्याचे कारण म्हणजे, सोन्यावर कधीच कोणतंही व्याज किंवा परतावा मिळत नाही. यामुळे गुंतवणूकदारांनी आपले लक्ष व्याज देणाऱ्या स्किमकडे वळवले आहे. मॅकलॉड यांनी या पारंपरिक विचारसरणीवर टीका केली आहे. फेडरल रिझर्व्हच्या पुढील संभाव्य व्याजदरवाढीबद्दलची अनिश्चितता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन चलनावर घोंघावणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून विचलित करत आहे. सोन्याचे मूल्यमापन केवळ व्याजदरांच्या आधारावर करणे ही एक मोठी चूक ठरू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

7 / 8

अमेरिकन गुंतवणूकदारांकडे सोन्याचा साठा खूपच कमी आहे, त्यांचा शेअर बाजार गंभीर मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात रोख रकमेची कमतरता भासल्यास, गुंतवणूकदारांना पैसे उभारण्यासाठी सर्व प्रकारची मालमत्ता विकण्यास भाग पडू शकते. मॅकलॉड यांनी गुंतवणूकदारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, खरा धोका सोन्यात नसून पत बाजारात (क्रेडिट मार्केटमध्ये) आहे. त्यामुळे, कर्ज-आधारित गुंतवणुकीपासून दूर राहून प्रत्यक्ष सोने स्वतःजवळ ठेवणे हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

8 / 8

बँकेला अमेरिकन डॉलरला पाठिंबा द्यायचा की डळमळीत होत असलेल्या आर्थिक बाजारांना वाचवायचे, याचा निर्णय घ्यावा लागेल. जर बाजारावरील दबाव वाढला, तर अर्थव्यवस्थेला हाताळण्यासाठी बँकेला रोख रक्कम ओतावी लागेल आणि नियम शिथिल करावे लागतील. अशा उपायांमुळे बाजाराला तात्काळ दिलासा मिळू शकतो, परंतु त्यामुळे डॉलरवरील जनतेचा विश्वास कमकुवत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us