gold rate : सोन्याचे दर कडाडले तर चांदीने देखील भाव खाल्ला, सणासुदीत खिशाला चाट

सणासुदीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोने तसेच चांदीचे दागिने खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

gold rate : सोन्याचे दर कडाडले तर चांदीने देखील भाव खाल्ला, सणासुदीत खिशाला चाट
gold and silver rate news
| Updated on: Sep 18, 2026 | 6:39 PM

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे आणि चांदीचे दर देखील वाढले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे. गणपती त्यानंतर दुर्गात्सव दसरा आणि दिवाळी असे एकामोगामाग सणांची रेलचेल असताना सोने आणि चांदीचे दर भडकले आहेत. जळगावातील सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीतच सोने आणि चांदी महागल्याने या मौल्यवान धातूत गुंतवणूक करणाऱ्यांना संधी मिळाली आहे.

सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफबाजारात सोने आणि चांदीचे दर समोर आले असून त्यामुळे सणासुदीत सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोने दरात तब्बल २ हजारांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे जर ९ हजारांना महागले आहेत. सोन्याचे दर आता जीएसटीसह 1 लाख 57 हजार 75 रुपये आणि चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 75 रुपये झाले आहेत.

भारतात 10 ग्रॅम सोन्याची एक तोळा सोन्याची किंमत तीन लाख रुपयांच्या वर जाऊ शकते असा दावा केला जात आहे. सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब चिंतेची म्हटली जात आहे. सोने आणि चांदी गुंतवणूकदारांच्या दृष्ठीने मात्र ही बाब व्यापारासाठी चांगली असल्याचे म्हटले जात आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस 10000 डॉलर्सपर्यंत पोहचू शकतात असे जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी, ख्रिस वूड यांनी एका विशेष मुलाखतीत म्हटले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us