आठवडा संपता संपता, सोन्याचे दर घसरले; वाचा काय आहेत आजचे भाव

जागतिक बाजारात सेन्सेक्सनं उसळी मारल्यानंतर सोन्याचे भाव वधारले होते. पण आता आठवड्याच्या शेवटी पुन्हा सोनं घसरलं आहे.

आठवडा संपता संपता, सोन्याचे दर घसरले; वाचा काय आहेत आजचे भाव
gold silver price
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 10:01 AM

मुंबई : Gold price today 23 January 2021: अमेरिकेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे आणि कोरोना लसीच्या बातम्यांमुशे सराफा बाजारात सोन्यामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जागतिक बाजारात सेन्सेक्सनं उसळी मारल्यानंतर सोन्याचे भाव वधारले होते. पण आता आठवड्याच्या शेवटी पुन्हा सोनं घसरलं आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,510 वर पोहोचला. चांदीबद्दल बोलायचं झाल्यास आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 668 वर पोहोचली आहे. (gold rates today Gold price today 23 January 2021 know here todays rate in your city)

महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव

सोन्याचा भाव                आज                  काल

नागपूर                            48450              48550

पुणे                                  49,540             49,550

नाशिक                            49,540             49,550

नवी दिल्ली                       48240              48250

हैद्राबाद                           46090               46100

दागिने बनवण्याची उत्तम संधी

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांवर पोहोचली होती पण आज किंमत आणखी घसरली आहे. म्हणून सोनं खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे.

सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाल्यामुळे खरेदीदार खूश आहेत. अशात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत, या महिन्यात लोक दागिन्यांसाठी अधिक मागणी करत आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे कोणीही दागिन्यांकडे फार भर दिला नाही. पण आता लसीकरण सुरू झाल्यामुळे त्यात मकर संक्रांतीनंतर सोन्याची मागणी पुन्हा वाढली आहे.

सोन्याची मागणी आणखी वाढेल

पुढच्या 3-4 महिने सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते मे या कालावधीत लग्नाचा शुभ काळ असतो. त्यामुळे जूनपर्यंत सोनं खरेदी अशी सुरू राहिल. सध्या सोन्या-चांदीची किंमत कमी होत असल्याने लोक अगोदरच दागिन्यांची ऑर्डर देत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमध्ये अनेक विवाह थांबले होते. यावेळी लस येण्याची शक्यताही कमी होती. त्यामुळे लोकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली. पण आता पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं आहे. (gold rates today Gold price today 23 January 2021 know here todays rate in your city)

संबंधित बातम्या – 

मोठी बातमी जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ने दिली माहिती!

दागिने बनवायचे असतील तर उशिर करू नका, सोन्या-चांदीचे भाव घसरले

Gold-Silver Rate Today | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, सोने-चांदीचे भाव घसरले

(gold rates today Gold price today 23 January 2021 know here todays rate in your city)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.