Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, सोने-चांदीचे भाव घसरले

MCX वर आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजता 5 फेब्रुवारीच्या सोन्यात 83 रुपयांची घट होऊन सोनं 49 हजार 365 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे.

Gold-Silver Rate Today | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, सोने-चांदीचे भाव घसरले
gold silver price
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 12:03 PM

मुंबई : MCX वर आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे (Gold-Silver Rate Decreases). सकाळी 10 वाजता 5 फेब्रुवारीच्या सोन्यात 83 रुपयांची घट होऊन सोनं 49 हजार 365 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. आज सकाळी सोनं 93 रुपयांनी घसरुन 49 हजार 355 रुपयांवर उघडलं. गुरुवारी हे 49 हजार 448 रुपयांवर बंद झालं होतं (Gold-Silver Rate Decreases).

त्यासोबतच एप्रिलचं सोनं (Gold rate today) सध्या 56 रुपयांनी घसरुन 49 हजार 540 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 35 रुपयांची घसरुन होऊन 49 हजार 561 रुपयांवर उघडलं. गुरुवारी हा 49 हजार 596 रुपयांवर बंद झालं होतं.

चांदीच्या दरातही सध्या घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 मार्चच्या चांदीमध्ये 475 रुपयांची घसरण होऊन चांदी 66 हजार 825 रुपए प्रति किलोग्रामवर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 300 रुपयांची घसरण होऊन 67 हजार रुपयांवर उघडलं. गुरुवारी चांदी 67 हजार 300 रुपयांच्या स्तरावर बंद झाली होती. मेच्या चांदीमध्ये 497 रुपयांची घसरण होऊन 67 हजार 665 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 427 रुपयांची घसरण होऊन 67 हजार 735 रुपयांच्या स्तरावर उघडली होती. गुरुवारी ही 68 हजार 162 रुपयांवर बंद झाली होती.

आंतराष्ट्रीय बाजारातील भाव (Gold-Silver international rate)

आंतराष्ट्रीय बाजारातही सोन्यात आज घसरण पाहायला मिळाली (Gold international rate). इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाईटनुसार, 21 फेब्रुवारीच्या सोन्यात 204.42 रुपयांची घसरण होऊन 1863.10 डॉलर म्हणजेच जवळपास 1,36,025 रुपये प्रति आउंसच्या स्तरावर व्यापार करत होता. सध्या 21 मार्चच्या चांदीमध्ये 11.68 रुपयांची घसरण होऊन जवळपास 1,875 रुपये प्रति आउंसच्या स्तरावर व्यापार करत आहे (Silver international rate). एक आउंसमध्ये 28.34 ग्राम असतात.

आजचा सोन्याचा भाव Gold rate today

गुड रिटर्नच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव हैद्राबादमध्ये 46 हजार 100 रुपये, अहमदाबादमध्ये 48 हजार 990 रुपये, जयपूर-लखनऊमध्ये 48 हजार 410 रुपये, पाटणामध्ये 48 हजार 610 रुपये आणि सूरतमध्ये 48 हजार 990 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेटचा भाव सूरतमध्ये 50 हजार 990 रुपये, पटना में 49610 रुपए, लखनऊ और जयपुर में 52810 रुपए, अहमदाबाद में 50990 रुपए और हैद्राबाद मध्ये 50 हजार 460 रुपये प्रति तोळा आहे.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव प्रति तोळा

मुंबई – 50,300

नागपूर – 49,610

पुणे – 49,610

नाशिक – 49,610

जळगाव – 49,610

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील चांदीचा भाव प्रति किलोग्राम

मुंबई  – 67,400

नागपूर – 67,400

पुणे – 67,400

नाशिक – 67,400

जळगाव – 67,400

Gold-Silver Rate Decreases

संबंधित बातम्या :

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.