सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

यंदाच्या वर्षात तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. (Gold Storage Limit At Home)

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी 'हे' लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 10:57 PM

मुंबई : सोने हे गुंतवणूकीसाठी नेहमीच सुरक्षित समजले जाते. त्यामुळे भारतीयांना सोन्याबद्दल अत्यंत रस आहे. प्रत्येक शुभ कार्यात सोने-चांदीची खरेदी केली जाते. यामुळेच भारत जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. त्यामुळे कोरोना काळातही भारत गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ठरलं होतं. (Gold Storage Limit At Home)

गेल्यावर्षी सोने खरेदीत 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. यंदाही अशाच प्रकारे चांगले उत्पन्न मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडू शकते.

इन्कम टॅक्स कायद्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला घरात सोने ठेवण्यासाठी काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. घरात सोने ठेवण्याच्या मर्यादेचा कोणाच्याही उत्पन्नाशी काही संबंध नसतो. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, याचा सोने बाळगण्याशी काहीही संबंध येत नाही. जर एखाद्या महिलेचे लग्न झाले असेल, तर ती स्वत:कडे 500 ग्रॅमपर्यंत सोने ठेवू शकते. जर मुलगी विवाहित नसेल तर ती 250 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकते. पुरुषांसाठी ही मर्यादा 100 ग्रॅम इतकी आहे.

दरम्यान जर कोणाकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल, तर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून तुमची चौकशी केली जाऊ शकते. त्यांनी ही चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या संदर्भात टॅक्स अधिकारी काय निर्णय घेतो, हे त्या अधिकाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या कुटुंबांत काय प्रथा आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी कारवाईचा निर्णय घेतात.

CBDT चे म्हणणं काय?

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Direct Taxes CBDT) यांनी 1 डिसेंबर 2016 रोजी याबाबत एक प्रेस नोट जारी केले होतं. या प्रेसनोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जरी सोनं ठेवण्याच्या मर्यादेवर काही नियम लावण्यात आले असेल, तरीही याबाबत काही अटीशर्थी आहेत. जर तुम्हाला काही सोने वारसाहक्काने मिळालं असेल किंवा ते तुम्हाला कोणी गिफ्ट केले असेल, तर तुम्ही आयकर अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊन या कारवाईतून वाचू शकता.  (Gold Storage Limit At Home)

संबंधित बातम्या : 

Gold Silver Price Updates : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीला झळाळी, वाचा आजचे दर…

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.