जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:56 AM, 23 Jan 2021
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

मुंबई : जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या  नोटासंदर्भात रिझर्व्ह बँकेने  महत्त्वाची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनातून हटवण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. (Old 100, 10 and 5 notes will not be valid after March)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील. वास्तविक, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे.  दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जातात.

बरेच व्यापारी किंवा दुकानदार त्यांना घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफव्यांवर लक्ष देऊ नये.

संबंधित बातम्या : 

देशातील ‘या’ तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य

Bank Alert | 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा बंद होईल बँक खाते, ‘या’ बँकेचे ग्राहकांना फर्मान!

अचानक पैशांची गरज आहे तर SBI करेल मदत, जाणून घ्या काय आहे खास योजना?

(Old 100, 10 and 5 notes will not be valid after March)