Bank Alert | 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा बंद होईल बँक खाते, ‘या’ बँकेचे ग्राहकांना फर्मान!

ग्राहक केवायसीची कागदपत्रे त्यांच्या होम ब्रँच किंवा जवळच्या आयडीबीआय शाखेत सादर करू शकतात.

Bank Alert | 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा बंद होईल बँक खाते, ‘या’ बँकेचे ग्राहकांना फर्मान!
आयडीबीआय बँक
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 8:19 AM

मुंबई : जर तुम्ही आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) ग्राहक असाल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत KYCचे काम पूर्ण करावे लागेल. बँकेने नुकतीच एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितले. बँकेने ग्राहकांना सांगितले की, लवकरात लवकर केवायसी अद्ययावत करावी, अन्यथा संबंधित ग्राहकांच्या बँकिंग सेवा थांबवण्यात येतील. बँकेने जारी केलेल्या या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मार्च 2021पर्यंत केवायसी अपडेट करावी लागेल (IDBI Bank KYC update alert to customer).

ग्राहक केवायसीची कागदपत्रे त्यांच्या होम ब्रँच किंवा जवळच्या आयडीबीआय शाखेत सादर करू शकतात. यासह, बँकेने हे देखील स्पष्ट केले की, याव्यतिरिक्त केवायसी करण्यासाठी ग्राहकांना इतर कोणतीही सुविधा दिली जाणार नाही.

पॅनकार्ड देऊन केवायसी करा.

आयडीबीआय बँकेच्या मते, केवायसीसाठी ग्राहकांना पॅनकार्ड किंवा फॉर्म 60 भरावा लागतो. याशिवाय ओळखपत्र व पुरावा म्हणून ग्राहक पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा जॉब कार्ड किंवा आधार कार्ड सबमिट करू शकतात. ग्राहकांना ओळखीसाठी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागतील. यात ग्राहक पॅन कार्डचा वापर करू शकतात. यासह ग्राहकाला पासपोर्ट आकाराचा फोटोही द्यावा लागेल (IDBI Bank KYC update alert to customer).

या क्रमांकावरून मिळवा अधिकची माहिती…

केवायसीबाबत तुम्हाला माहिती हवी असल्यास, अधिक माहितीसाठी तुम्ही www.idbi.in बँकेच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त ग्राहक होम ब्रँच किंवा ग्राहक सेवा क्रमांक 1800-209-4324, 1800-22-1070 किंवा 022-67719100 वर संपर्क देखील साधू शकतात. आयडीबीआय बँकेने केवायसीसाठी ग्राहकांना आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. यासाठी बँकेने ग्राहकांना एसएमएस, ईमेल आणि पत्राद्वारे केवायसी अद्ययावत करण्याची सूचना दिली आहे.

केवायसी करणे आवश्यक

केवायसी अपडेट करणे रिझर्व्ह बँकेने अनिवार्य केले असून, कोणत्याही बँकेत खाते उघडण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. केवायसीमार्फत बँका आपल्या ग्राहकांची संपूर्ण माहिती सादर करतात, त्यासाठी ग्राहकांना त्यांची ओळख व पत्त्याच्या पुराव्यांसाठी कागदपत्रे सादर करावी लागतात.

(IDBI Bank KYC update alert to customer)

हेही वाचा :

SBI ग्राहकांसाठी बँकेचा अलर्ट! KYC पडताळणीसाठी फोन किंवा मेसेज आला तर सावधानhttps://t.co/WFUOSiXOeV

— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2020

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.