आरबीआयच्या निर्बंधानंतर ‘Yes बँके’बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा

खासगी क्षेत्रातील येस बँकवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) निर्बंध लागू होताच खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Yes Bank Withdrawal Limit) आहे.

आरबीआयच्या निर्बंधानंतर 'Yes बँके'बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 8:52 AM

मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) निर्बंध लागू होताच खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Yes Bank Withdrawal Limit) आहे. पंजाब नॅशनल बँकेनंतर आता येस बँकच्या खातेदारकांनाही फटका बसणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. निर्बंध लागू होताच काही खातेदारांनी रात्री जाऊन येस बँकच्या एटीएम बाहेर गर्दी केली (Yes Bank Withdrawal Limit) होती.

“आरबीआयने जे निर्बंध घातले आहेत त्याची आम्हाला कल्पना नव्हती. एटीएममध्येही पैसे नाहीत. होळीचा सण येत आहे. आम्ही पैसे काढायचे कुठून”, असा सवाल खातेदारांनी केला.

मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या खाजगी क्षेत्रातील येस बँकेला आरबीआयने 30 दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या या स्थगितीनंतर खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. आरबीआयने सरकारशी याबाबत चर्चा केल्यानंतर बँकेच्या निदेशक मंडळाच्या क्षमतेच्या पुढे जात 30 दिवसांसाठी हा निर्णय घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, काल सायंकाळी (5 मार्च) 6 वाजल्यापासून ही स्थगिती लागू करण्यात आली आहे. येत्या 3 एप्रिलपर्यंत ही स्थगिती लागू राहील.

SBI च्या माजी अधिकाऱ्याकडे YES बँकेची सूत्र

बँकेच्या वाईट आर्थिक परिस्थितीला पाहता RBI ने SBI चे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना YES बँकेचे संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

माहितीनुसार, या स्थगितीदरनम्या कुठल्याही खाते दारकाला त्याच्या कुठल्याही बचत, चालू किंवा इतर कुठल्याही खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही. जरी या बँकेत एका खातेदारकाचे एकापेक्षा जास्त खाते असेल. तरी बँकेतून एकूण 50 हजाराची रक्कमच काढू शकतो, अशी माहिती आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती वाईट झाली. भारतीय स्टेट बँक आणि इतर आर्थिक संस्था YES बँकेला या संकटातून बाहेर काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी (5 मार्च) दिली. एसबीआयला यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.

RBI चे पीएमसी बँकेवर निर्बंध

काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनियमिततेपोटी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. सुरुवातीला ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता.

6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. यानंतर 26 सप्टेंबरला ही मर्यादा वाढवून 10 हजार करण्यात आली. तसेच 3 ऑक्टोबरला या मर्यादेत वाढ करुन ती 25 हजार केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.