AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Prices 02 March 2026 : सकाळी सकाळीच वाट लागली… सोन्या-चांदीच्या भावाचा भडका; दुकानात जाताना रेट पाहाच!

Gold-Silver Rate Today 02 March 2026Latest News Updates in Marathi : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि इराणवरील हल्ल्यांमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची झळाली खूपच वाढली आहे. आजचे ताजे दर काय ?

Gold Silver Prices 02 March 2026 : सकाळी सकाळीच वाट लागली... सोन्या-चांदीच्या भावाचा भडका; दुकानात जाताना रेट पाहाच!
सोनं चादीचे दर आज किती ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 02, 2026 | 10:53 AM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फक्त त्यांच्या देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावरच परिणाम झालेला दिसत आहे. या युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरातही अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही धातूंचे दर सध्या चांगलेच वाढताला दिसत आहेत. युद्धाची ही स्थिती जर अशीच कायम राहिली तर येत्या काळात सोनं आणखी महाग होऊन त्याचे भाव गगनाला भिडू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी महीना कालच संपला. या महिन्याभरात सोन्यात प्रचंड वाढ झालेली दिसून आली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा भाव 5.056 टक्क्यांनी वाढला होता. तर आता युद्धामुळे आजही सोन्याचा भाव वाढताना दिसत असून चांदीची झळाळीदेखील कमी झालेली नाही.

गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

आज सोने आणि चांदीच्या बाजारात खूप हलचल आहे. जर तुम्ही आज, 2 मार्च, होळीच्या मुहूर्तावर सोनं किंवा आणि चांदीचं दागिने खरेदी करण्याचा किंवा त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी आजच्या लेटेस्ट दरांवर एक नजर टाका. सोन्या-चांदीचे नवे भाव काय ते जाणून घ्या.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आज, सोमवार, 2 मार्च 2026 रोजी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, सोन्याच्या किमतीत 2% ची लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं हे प्रति औंस 5,384.52 डॉलर्स या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचलं आहे. या युद्धामुळे सोने आणि चांदी पुन्हा एकदा महाग होईल का , असाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घोळत आहे.

सोनं अखेर किती महागलं ?

गेल्या आठवड्यात, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमती ₹22,054 (8.72%) आणि सोन्याच्या किमती 5,228 रु (3.33%) ने वाढल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्येही आज सकाळपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत.

भारतीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आज विक्रमी पातळीवर पोहोचल्या. मागील व्यापार सत्रात प्रति 10 ग्रॅम 1,62,490 रुपये असा भाव असलेल्या, सोन्याचा दर आज सोमवारी 1,73,090 रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की फक्त एकाच व्यापार सत्रात सोन्याच्या किमतीत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावापाठोपाठ आज चांदीनेही लक्षणीय वाढ नोंदवली. शुक्रवारी (27 फेब्रुवारी) चांदीचा भाव2,82,140 रुपये प्रति किलोवर बंद झाला. पण आज सकाळी, सोमवारी चांदीचा दर 2,94,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला. बुलियन वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, युद्धाच्या अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंची मागणी झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे बाजारात ही ऐतिहासिक तेजी दिसून येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...