AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : युद्ध संपले तरी गुड न्यूज नाही, आज सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

Gold Price Today 16 April 2026 Latest News Updates in Marathi : आंतरराष्ट्रीय बाजाराचे देशांतर्गत सराफा बाजारावर परिणाम होत असून सोनं-चांदीचे दर सतत वरखाली होत राहतात. गुरुवारी सकाळी सोन्याच्या दरात बदल पहायला मिळाला. आज 10 ग्रॅम सोन्याचे दर...

Gold Price Today : युद्ध संपले तरी गुड न्यूज नाही, आज सोनं उच्चांकाच्या... जाणून घ्या रेट
सोन आज स्वस्त की महाग ?
| Updated on: Apr 16, 2026 | 11:16 AM
Share

अक्षय्य तृतीया.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी बहुतांश लोकं आवर्जून सोनं खरदी करतात. अगदी खूप जमलं नाही तरी शुभ म्हणून थोडं तरी सोनं या दिवशी विकत घेतलं जातं. हाच अक्षय्य तृतीयेचा दिवस आता जवळ आला आहे. मात्र सराफा बाजारात होणाऱ्या घडामोडी आणि सोनं-चांदीचे गगनाला भिडलेले भाव पाहून सोनं विकत घ्यायचं तर कसं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान अक्षय्य तृतीयेला अजून काही दिवस बाकी असतानाच आज गुरूवार, 16 एप्रिल रोजी सोन्याचे दर समोर आले आहेत. देशांतर्गत बाजारात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातू स्वस्त झाला की महागला, ते जाणून घेऊया.

सध्या देशात सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. गुरूवार, 16 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,510 रुपयांपर्यंत वाढला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये इतका झाला आहे. आदल्याच दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3000 रुपयांनी म्हणजेच सुमारे 2 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,58,000 रुपयांवर पोहोचला होता. अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दागिने विक्रेते आणि साठेदार चांगली खरेदी करत आहेत.

अक्षय तृतीया हा मौल्यवान धातू खरेदी करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो. यावर्षी हा सण रविवारी, 19 एप्रिल रोजी आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,795.97 डॉलर आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी करार होण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले. त्यामुळे सोन्याचे भाव सतत वरखालीच होत होते. याशिवा डॉलरची कमजोरी हे देखील सोन्याच्या भाववाढीचे एक महत्त्वाचे कारण आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट घ्या जाणून

दिल्लीतील सोन्याचा भाव: दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,510 रुपये आहे. 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,42, 560 रुपयांना मिळत आहे.

मुंबई आणि कोलकाता: सध्या मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,090 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये आहे.

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,56,230 प्रति 10 ग्रॅम इतका असून 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1,43,210 रुपये मोजावे लागतील.

पुणे आणि बंगळूरुमधील दर: ​​या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,40,090 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 142560 155510
मुंबई 142410 155360
अहमदाबाद 142460 155410
चेन्नई 140990 156230
कोलकाता 142410 155360
हैदराबाद 142410 155360
जयपुर 142560 155510
भोपाळ 142460 155410
लखनऊ 142560 155510
चंदीगड 142560 155510

चांदीच्या दरांची स्थिती काय ?

एकीकडे सोन्याच्या किमतींनी डोक वर काढलेलं असताना, आज चांदीची चमकही वाढली आहे. 16 एप्रिलच्या सकाळी चांदीचा भाव वाढलेला दिसत आहे, 1 किलो चांदी ही 2 लाख 70 हजार 100 रुपये आहे. एक दिवसापूर्वी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 11,800 रुपयांनी, म्हणजेच 4.81 टक्क्यांनी वाढून 2,57,000 रुपये प्रति किलोग्राम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 78.61 डॉलर आहे. सध्या चांदी महाग झाली असली, तरी जानेवारीत जेव्हा त्याचा भाव 4 लाखांच्या पार पोहोचला होता, त्या उच्चांकाच्या तुलनेत चांदी सध्या स्वस्त दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...