Gold Silver Price Today 16 February 2026 : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज ! लगेच घ्या सोनाराकडे धाव, 10 ग्रॅम सोन्याचा तुमच्या शहरात किती भाव ?

Gold-Silver Rate Today 16 February 2026 Latest News Updates in Marathi : सोमवारी बाजार सुरू होताच सोनं- चांदीचे भाव घसरतात की वाढतात, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. मात्र ग्राहकांना आज दिलासा मिळाला असून सोन्याच्या दरात घसरण झालेली पहायला मिळाली. तुमच्या शहरात आज सोन्याचे दर किती ?

Gold Silver Price Today 16 February 2026  : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज ! लगेच घ्या सोनाराकडे धाव, 10 ग्रॅम सोन्याचा तुमच्या शहरात किती भाव ?
आज सोन्याचे दर किती ?
| Updated on: Feb 16, 2026 | 12:06 PM

Gold Silver Price Today : वाढता वाढता वाढे…. ही एकच ओळ गेले कित्येक दिवस सोनं-चांदीबाबत लागू होत होती. णध्येच दर कमी झाले की दुसऱ्या दिवशी ते वाढून डब्बल झालेच समजा. लग्नसराई, मुंजी, कार्य जवळ आल्यावर गळ्यात, हातात सोन्याचा दागिना उठून दिसावा हे प्रत्येकालाच वाटतं. पण वाढत्या भावामुळे सोनं घेण्याचं स्वप्न दुरापास्त होतं. मात्र असं असलं तरी आता सोन्याचे भाव थोडे खाली आले असून आठवड्याच्या पहिल्याचदिवशी, सोमवारी (16 फेब्रुवारी) बाजार सुरू होताच सोन्याची चमक कमी झाली, ते सुळक्कन खाली घसरली. चांदीची चकाकीही धडकी भरवणारी नसून त्याचा दर तर कित्येक हजारांनी घसरला आहे.

सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी देशांतर्गत फ्यूचर मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 एप्रिल 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅमसाठी ग्रॅम 1,54,999 रुपयांवर उघडले. शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोनं हे 1,55,895 रुपयांवर बंद झालं होतं.

मात्र आज साकळी (सोमवारी) बाजार उघडल्यावर एमसीएक्सवर, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेले सोने 1.02 टक्क्यांनी किंवा सुमारे 1600 रुपयांनी घसरून 1,54,300 रुपयांवर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्यूचर वायदा 1,55,100 रुपए रुपयांचा उच्चांक गाठला होता.

चांदीची किंमत

5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी एमसीएक्सवर 3.48व टक्क्यांनी म्हणजेच 8 हजार 492रुपयांनी घसरून 2,35,868 रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा भाव व्यवहाराच्या दिवशी 2,38,489 वर उघडला.
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे आज 10 ग्रॅम चांदी ही 2,680 रुपयांना विकली जात आहे. दरम्यान, ग्राहकांना 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी 26,800 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2800 रुपये आहे.

विविध शहरातील दर जाणून घेऊया..

दिल्लीतील सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,56,590 रुपये
22 कॅरेट – 1,43,550 रुपये
18 कॅरेट – 1,17,480 रुपये

मुंबईचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कैरेट – 1,56,440 रुपये
22 कॅरेट – 1,43,400 रुपये
18 कॅरेट – 1,17,330 रुपये

चेन्नईत दर किती ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,57,530 रुपये
22 कॅरेट – 1,44,400 रुपये
18 कॅरेट – 1,23,500 रुपये

कोलकात्यामध्ये सोन्याचा दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,56,440 रुपये
22 कॅरेट – 1,43,400 रुपये
18 कॅरेट – 1,17,330 रुपये

अहमदाबाद मधील दर प्रति 10 ग्राम

24 कॅरेट – 1,56,490 रुपये
22 कॅरेट – 1,43,450 रुपये
18 कॅरेट – 1,17,380 रुपये

लखनऊ मधले दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,56,590 रुपये
22 कॅरेट – 1,43,550 रुपये
18 कॅरेट – 1,17,480 रुपये

पाटणामध्ये सोनं कितीला ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,56,490 रुपये
22 कॅरेट – 1,43,450 रुपये
18 कॅरेट – 1,17,380 रुपये

हैदराबाद मध्ये 10 ग्राम सोन्याचे दर

24 कॅरेट – 1,56,440 रुपये
22 कॅरेट – 1,43,400 रुपये
18 कॅरेट – 1,17,330 रुपये