AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा लांब पल्ला, इतक्या उसळल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने पुन्हा गरबा केला. यापूर्वी किंमतीत घसरण दिसून आली होती. यंदा मात्र सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दसऱ्या मुहूर्तावर मौल्यवान धातूत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा खिसा कापल्या जाणार आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा लांब पल्ला, इतक्या उसळल्या किंमती
| Updated on: Oct 19, 2023 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : जागतिक घडामोडींचे परिणाम सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात 19 महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण आली होती. बुधवारी सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price Today 19 October 2023) पुन्हा उसळी घेतली. दोन्ही मौल्यवान धातू दसऱ्याला दरवाढीचा मुहूर्त गाठण्याची शक्यता आहे. दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.

सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस भावात घसरण दिसली. 16 ऑक्टोबर रोजी सोने 340 रुपयांनी उतरले. तर 17 ऑक्टोबर रोजी सोन्यात 160 रुपयांची घसरण झाली. 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी वधारले. 22 कॅरेट सोने 55,610 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात सोन्यात घसरण कायम राहिल्यास ग्राहकांचा दसरा हसरा होईल.

चांदीचा भाव काय

या आठवड्यात सुरुवातीला चांदीत घसरण दिसून आली. चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले. 17 ऑक्टोबरला चांदीत 500 रुपयांनी उतरली. त्यापूर्वी भाव जैसे थे होते. बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी किंमतींनी एक हजार रुपयांची उसळी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 59,840 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,600 रुपये, 22 कॅरेट सोने 54,813 रुपये, 18 कॅरेट 44,880 रुपये, 14 कॅरेट सोने 35,006 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,197 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा