AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : अरे वा ! सकाळीच सोन्याची गुड न्युज, खरेदी आता स्वस्त.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

Gold Rate Today 03 June 2026 Latest News Updates in Marathi : दिवसभरया स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याची चमक फिकी पडली आहे, तर सलग चार दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. देशभरातील दहा प्रमुख शहरांमध्ये 24-कॅरेट, 22-कॅरेट आणि 18-कॅरेट सोन्याचे भाव घ्या जाणून..

Gold Price Today : अरे वा ! सकाळीच सोन्याची गुड न्युज, खरेदी आता स्वस्त.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर
आज सोनं-चांदीचे दर घसरले
| Updated on: Jun 03, 2026 | 9:01 AM
Share

Gold Rate Today : भू-राजकीय तणावामुळे सोन्यावर दबाव आला आहे. दिवसभर भाव स्थिर राहिल्यानंतर सकाळी सोन्याचे भाव पडण्याचा सिलसिला कायम असून आजही सोन्याची चमक फिकी पडली आहे. एवढंच नव्हे तर उद्योगांकडून मागणीबाबतच्या अनिश्चिततेमुळे चांदीवरही दबाव आला आणि त्यामुळे आज तिची चमकही कमी झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज 3 जून रोजी सोन्याची चमक कमी झाली आहे. यापूर्वी 1 जून रोजी 10 ग्रॅमचं 24 कॅरेट सोने 820 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोनं 750 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आजच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास, राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 10 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचे दर देखील 10 रुपयांनी कमी झाले आहेत.

आणि चांदीबद्दल बोलायचं झालं तर सलग चार दिवसांच्या स्थिरतेनंतर आज दिल्लीत ती स्वस्त झाली आहे. आज चांदीच्या दरात प्रति किलो 100 रुपयांची घट झाली आहे. मात्र, चांदीबाबत एक महत्त्वाची बातमी अशी आहे की, सरकारने तिच्या आयातीचे नियम आणखी कडक केले आहेत. आता, काही विशिष्ट मार्गांनी चांदी आयात करण्यासाठी परकीय व्यापार महासंचालनालयाची (DGFT) परवानगी घेणे आवश्यक असेल. हा नियम 99.9 % किंवा त्याहून अधिक शुद्धता असलेल्या चांदीला लागू होतो. यामध्ये सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा दिलेल्या चांदीचाही समावेश आहे.

देशभरातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव किती ?

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड दर 22 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड दर 18 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड दर
दिल्ली ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
मुंबई ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
कोलकाता ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
चेन्नई ₹1,58,170 ₹1,44,990 ₹1,21,790
बंगळुरू ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
हैदराबाद ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
लखनऊ ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
पाटणा ₹1,56,260 ₹1,43,240 ₹1,17,210
जयपुर ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
अहमदाबाद ₹1,56,260 ₹1,43,240 ₹1,17,210

चांदीच्या किमतीतही घसरण

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज तिचा भाव खाली आला आहे. या तीन दिवसांच्या स्थिरतेपूर्वी, 29 मे रोजी चांदीचा भाव प्रति किलो 5000 रुपयांनी वाढला होता. आता, 3 जून रोजू मात्र दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो 100 रुपयांनी स्वस्त झाला असून चांदी 2, 79, 900 रुपयांना विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांमध्ये, म्हणजेच मुंबई आणि कोलकाता येथेही ती त्याच भावाने विकली जात आहे. पण चेन्नईमध्ये मात्र एक किलो चांदीचा भाव जास्त असून तो 2, 89, 900 रुपये आहे, म्हणजेच चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी