AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : आज सुपर सॅटरडे, कालपेक्षा आज सोनं.. काय आहेत आजचे रेट?

Gold Price Today 4 April 2026 in Marathi : पश्चिम आशियामध्ये इराणविरुद्ध सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा या मौल्यवान धातूंच्या किमतींवर डायरेक्ट परिणाम होत आहे. आज 4 एप्रिल रोजी सोनं-चांदीचे दर किती आहेत ?

Gold Price Today : आज सुपर सॅटरडे, कालपेक्षा आज सोनं.. काय आहेत आजचे रेट?
4 एप्रिल रोजी सोन्याचे दर किती ?Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 04, 2026 | 10:00 AM
Share

Gold Price Today In India : इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मागील सत्रातील घसरणीनंतर, आता सोन्याच्या दरात जोरदार सुधारणा दिसून आली आहे. देशांतर्गत बाजारातील वाढलेली खरेदी, तसेच जागतिक तणावामुळेही सोन्याला चांगलाच आधार मिळाला आहे. विशेषतः, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले तीव्र करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आलं आहे.

जर आजच्या, शनिवार 4 एप्रिलच्या भावाबद्दल बोलायचं झालं तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींनी मोठी उसळण मारल्याचं दिसून आलं. गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, 4 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 196 रुपयांनी वाढून 15,093 रुपये झाला आहे, तर 10 ग्रॅमचा भाव 1,50,930 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 180 रुपयांनी वाढून 13हाजर 83 रुपये इतका झालाय , 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हमजेच 1 तोळा सोन्यासाठी आता 1,38, 350 रुपये मोजावे लागणार आहेत.

या तेजीतून 18 कॅरेट सोनंदेखील सुटलेलं नाही. त्याचा भाव 147 रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम 11,320 रुपये झाला, तर 10 ग्रॅमचा दर 1,13,200 रुपयांवर पोहोचला. याचाच अर्थ असा की, सर्व प्रकारच्या सोन्याने गुंतवणूकदारांना दिलासा दिला असून, बाजारात पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या खिशावरील भार मात्र आता वाढणार आहे.

जागतिक बाजारातही सोन्याची तेजी

आंतरराष्ट्रीय स्तरावरही, सोन्याच्या दरात वाढ झाली. स्पॉट गोल्ड 0.51१% नी वाढून प्रति औंस 4,676.4 वर व्यवहार करत होते, तर स्पॉट सिल्व्हरदेखील 0.28% नी वाढून प्रति औंस 72.99 वर व्यवहार करत होते.

भारतीय देशांतर्गत बाजारात, एमसीएक्सवर 24-कॅरेट सोन्याचा भाव 3 एप्रिल रोजी 30 रुपयांनी किंचित घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 49,650 रुपयांवर बंद झाला. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,740 रुपये नोंदवला गेला.

तुमच्या शहरात दर किती ?

या घटकांवर ठेवा लक्ष

जागतिक स्तरावर, सोन्याची हालचाल अनेक घटकांमध्ये गुंतलेली असते. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे एकीकडे सोन्याचे सुरक्षित गुंतवणूक म्हणून स्थान मजबूत होत आहे, तर दुसरीकडे मजबूत झालेला अमेरिकन डॉलर आणि वाढते बॉण्ड उत्पन्न हे सोन्याच्या तेजीला खीळ घालू शकतात. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू राहू शकतो. जागतिक तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, परंतु व्याजदर आणि डॉलर मजबूत राहिल्यास ही वाढ मर्यादित राहू शकते. सध्या तरी, सोने गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा एक आकर्षक पर्याय म्हणून समोर आले आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?