AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : आता काही खरं नाही, कालच्यापेक्षा आज सोन्याचे भाव… तुमच्या बजेटच्या…

Gold Price Today 17 April 2026 Latest News Updates in Marathi : युद्धविरामादरम्यान अमेरिका-इराण यांच्या चर्चेची पुन्हा शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे सोनं-चांदीच्या दरावरही परिणाम होत असतात. सोनं-चांदीची किंमत सातत्याने वर-खाली होत आहेत. 17 एप्रिलला 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ?

Gold Price Today  : आता काही खरं नाही, कालच्यापेक्षा आज सोन्याचे भाव... तुमच्या बजेटच्या...
17 एप्रिल रोजी सोन्याचा भाव किती ?
| Updated on: Apr 17, 2026 | 9:55 AM
Share

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया अगदी जवळ आली असून या दिवशी बहुतांश लोकं सोनं खरेदी करण्यास प्राधान्य देतात. या रविवारी, 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया असून त्याच पार्श्वभूमीवर सराफ आणि स्टॉकिस्ट मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे देखील सोन्याच्या दरावर परिणाम होत असतात. अक्षय्य तृतीयेच्या सणापूर्वी सराफ आणि स्टॉकिस्ट यांनी केलेल्या नवीन खरेदीमुळे शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आलं. पण चांदीचे दर घसरल्याचे दिसून आलं.

देशांत सोन्याची किंमत वर चढतीच आहे. शुक्रवार, 17 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,55,730 रुपयांपर्यंत वाढला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,55,580 इतका होता. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 200 रुपयांनीने घसरून 1,57,800 प्रति 10 ग्रॅम इतका झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,809.16 आहे.

याच दरम्यान मध्यपूर्वेतून एक चांगली बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांमध्ये 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे. ही शस्त्रसंधी भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे 2:30 पासून लागू झाली आहे. याशिवाय इराणने अण्वस्त्रे न बाळगण्यास सहमती दर्शवली असून लवकरच एक करार अंतिम होऊ शकतो असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. या घडामोडींचा सोन्याच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,55,730 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,42,560 आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथे सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,55,580 रुपयांना तर 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,42,610 रुपयांना मिळत आहे.

चेन्नईमध्ये सोन्याची किंमत सर्वाधिक असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,56,670 रुपये तर 22 कॅरेटचा दर हा 1,43,610 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. पुणे आणि बंगळुरू मध्ये 24 कॅरेट सोनं 1,55,580 रुपयांना आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,42,610 रुपयांना विकल जात आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे दर (₹)
दिल्ली 142760 155730
मुंबई 142610 155580
अहमदाबाद 142660 155630
चेन्नई 143610 156670
कोलकाता 142610 155580
हैदराबाद 142610 155580
जयपुर 142760 155730
भोपाळ 142660 155630
लखनऊ 142760 155730
चंदीगड 142760 155730

चांदीच्या दरांचं काय झालं ?

मात्र सोन्याच्या विपरीत स्थिती चांदीची दिसत आहे. चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूच्या दरात घट झाली आहे. 17 एप्रिलच्या सकाळी, किंमत घसरून 2,69,900 प्रति किलोग्राम झाली. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 1700 रुपयांची म्हणजेच सुमारे 1 टक्क्याने वाढ झाली आणि चांदीचे दर 2,58,700 प्रति किलोग्राम झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा व्यवहार 79.61 प्रति औंस दराने होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...