Gold Silver Price Today: सोने पुन्हा महागले, 48000 च्या जवळपास पोहोचल्या किमती, झटपट तपासा नवे दर

| Updated on: Jul 08, 2021 | 6:52 PM

स्थानिक वायदा बाजारामध्ये गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56 रुपयांनी वाढून 47,966 रुपयांवर पोहोचले

Gold Silver Price Today: सोने पुन्हा महागले, 48000 च्या जवळपास पोहोचल्या किमती, झटपट तपासा नवे दर
Follow us on

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीच्या किमतींच्या (Gold Silver Price Today) वाढीचा परिणामही आज स्थानिक बाजारात अर्थात गुरुवारी व्यापार सत्रात दिसून आला. स्थानिक वायदा बाजारामध्ये गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56 रुपयांनी वाढून 47,966 रुपयांवर पोहोचले, कारण सट्टेबाजांच्या व्यापारनंतर चांगली स्थिती निर्माण झालीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 56 रुपयांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 47,966 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यात व्यवसायाची उलाढाल 10,063 लॉटची होती. (Gold Silver Price Today: Gold Rises Again, Prices Close To 48000, What Is The Price Of Silver?)

बाजार का होता तेजीत

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे सोन्याचे वायदा भाव वाढले. न्यूयॉर्कमध्ये जागतिक पातळीवर सोन्याचे भाव 0.33 टक्क्यांनी वधारून 1,808 डॉलर प्रति औंस झाले.

चांदी प्रतिकिलो 162 रुपयांनी वाढली

गुरुवारी चांदीचे भाव 162 रुपयांनी वाढून 69,527 रुपये प्रतिकिलो राहिला, कारण मागणीच्या बळावर व्यावसायिकांनी केलेल्या खरेदीमुळे सोने महागले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमतीत 162 रुपये म्हणजेच ते 0.23 टक्क्यांनी वधारले. आता चांदीचा प्रति किलो 69,527 रुपये फ्युचर्स करार व्यवहार 10,862 लॉटमध्ये झाला.

जागतिक बाजारात वाढ

बाजारपेठेतील विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे स्थानिक बाजारात चांदीच्या किमती वाढल्या. वायदा व्यापारात चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर चांदीचे दर न्यूयॉर्कमध्ये 0.25 टक्क्यांनी वधारून 26.20 डॉलरवर पोहोचले. सोन्याच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. त्याच वेळी, फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर असा विश्वास आहे की, येत्या काळात सोने-चांदीच्या किमतीतील तेजीचा टप्पा परत येऊ शकेल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनादरम्यान सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर सोन्याच्या किमती सुमारे 8000 रुपयांनी स्वस्त झाल्या. पण आता त्यात पुन्हा जोरदार तेजी येऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

SBI बँकेत फोनद्वारे अवघ्या 10 मिनिटात उघडा खाते, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

UIDAIने आधार कार्डसंदर्भात केला अलर्ट जारी, आता फसवणूक टाळण्यासाठी व्हेरिफिकेशन आवश्यक

Gold Silver Price Today: Gold Rises Again, Prices Close To 48000, What Is The Price Of Silver?