AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज, सोन्याचे भाव धडाम् ! तुमच्या शहरात किती किंमत ?

Gold Price Today 18 April 2026 Latest News Updates in Marathi : भूराजनैतिक तमाव कमी होण्याबद्दल आणखी जास्त स्पष्टता अपेक्षित आहे. त्यामुळे बाजार अजूनही सतर्क आहे. सोन्या-चांदीच्या किमतींवर देशांतर्गत तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडत असतो. आज सोन्याचे दर किती ?

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज, सोन्याचे भाव धडाम् ! तुमच्या शहरात किती किंमत ?
सोन्याचे दर
| Updated on: Apr 18, 2026 | 10:11 AM
Share

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण अवघ्या एका दिवसावर आला असून त्याच्या आधीच ग्राहकांसाठी एक गुड न्यूज आली आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर झाला असून सोनं-चांदीच्या किमती चांगल्याच खाली घसरल्या आहेत. शनिवार 18 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव खाली घसरून 1,54,340 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर मुंबईत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,54,190 रुपयांना मिळतंय. एक दिवसापूर्वीच, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 1600 रुपये, 1.01 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 56, 200 रुपयांवर आला. उद्या, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून, या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,786.90 डॉलर आहे. भू-राजकीय तणाव कमी होण्याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, बाजार सावध असून, सोन्याचे भाव मर्यादित कक्षेत आहेत आणि किमती नरम पडल्या आहेत. इस्रायल आणि लेबनॉनने गुरुवारी भारतीय वेळेनुसार पहाटे 2:30० पासून लागू 10 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील सलोख्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर किती ?

राजधावी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोनं हे 1,54,340 रुपये प्रति 10 ग्राम असून 22 कॅरेटसाठी 1,41,490 रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबई व कोलकातामध्ये 22 कॅरेट सोनं हे 1,41,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,190 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

चेन्नईमधील सोन्याचा भाव सर्वाधिक असून 24 कॅरेटसाठी 1,55,010 रुपये तर 22 कॅरेटसाठी 1,42,090 रुपये मोजावे लागतील. पुणे आणि बंगळूरुमधीलया दोन शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,190 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,41,340 रुपये इतका आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 141490 154340
मुंबई 141340 154190
अहमदाबाद 141390 154240
चेन्नई 142090 155010
कोलकाता 141340 154190
हैदराबाद 141340 154190
जयपुर 141490 154340
भोपाल 141390 154240
लखनऊ 141490 154340
चंडीगढ़ 141490 154340

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याप्रमाणेच चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूच्या किमतीतही घट झालेली दिसून आली. आज 18 एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत घसरली असून एक किलो चांदीसाठी 2,64,900 रुपये इतका भाव आहे. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती 5,700 रुपयांनी म्हणजेच 2.2 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम 2,53,000 झाल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा व्यवहार प्रति औंस 79.28 दराने होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...