AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत चढउतार, या आठवड्यात भावात झाला असा बदल

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा मूड स्वींग होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत नरमाई आली होती. पुन्हा भावात वाढ झाली. त्यानंतर सोने-चांदीत घसरण झाली. सणासुदीत सराफा बाजारात भावात सतत चढउतार दिसून येत आहे. इस्त्राईल-हमास युद्ध सुरु होण्यापूर्वी दोन्ही धातूत मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत चढउतार, या आठवड्यात भावात झाला असा बदल
| Updated on: Oct 20, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास युद्धाने सर्वच समीकरणं बदलली आहे. हे युद्ध निर्णायक स्थितीत पोहचले आहे. कदाचित इतर राष्ट्र पण या युद्धात उडी मारु शकतात. तसे झाले तर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसू शकते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत (Gold Silver Price Today 20 October 2023) घसरण दिसली. त्यानंतर किंमती पुन्हा वधारल्या. तर गुरुवारी संध्याकाळी पुन्हा भावाने आपटी खाल्ली. गुडरिटर्न्स आणि आयबीजेएनने भावातील हा चढउतार नोंदवला आहे. युद्ध अजून भडकले तर कदाचित दसऱ्या पूर्वीच दोन्ही धातू दरवाढीची वर्दी देतील.

सोन्याचा मूड स्विंग

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. 16 ऑक्टोबरला सोन्यात 340 रुपयांची पडझड झाली. 17 ऑक्टोबरला किंमती 160 रुपयांनी घसरल्या. यु टर्न घेत सोने 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी वधारले. 19 ऑक्टोबर रोजी सोन्याने 270 रुपयांची उसळी घेतली. 22 कॅरेट सोने 55,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात सोन्यात घसरण कायम राहिल्यास ग्राहकांचा दसरा हसरा होईल.

चांदीत चढउतार

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले होते. 17 ऑक्टोबरला चांदीत 500 रुपयांनी उतरली. त्यापूर्वी भाव जैसे थे होते. बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी किंमतींनी 1 हजार रुपयांची वाढ झाली. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 59,940 रुपये होते. 23 कॅरेट 59,700 रुपये, 22 कॅरेट सोने 54,905 रुपये, 18 कॅरेट 44,955 रुपये, 14 कॅरेट सोने 35,065 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,324 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!