AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 11 July 2024 : सोने आणि चांदीचा पु्न्हा ग्राहकांना दिलासा; आता अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 11 July 2024 : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठी शांतता आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी आघाडी उघडली होती. आता किंमती कमी झाल्या आहेत.

Gold Silver Rate Today 11 July 2024 : सोने आणि चांदीचा पु्न्हा ग्राहकांना दिलासा; आता अशा आहेत किंमती
सोने-चांदीचे दर
| Updated on: Jul 11, 2024 | 8:30 AM
Share

ग्राहकांना सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत गेल्या दोन दिवसांपासून मोठी उसळी आली नाही. किंमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली होती. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही धातूंनी जोर बैठका काढल्या. त्यामुळे किंमती एकदम वधारल्या. तर आता दुसऱ्या आठवड्यात किंमतीत चढउतार दिसत आहे. अशा आहेत आता दोन्ही धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 11 July 2024 )

सोने नरमले

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांची भरारी घेतली होती. तर या आठवड्यात 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी तर 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी उतरले. 10 जुलै रोजी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या आघाडीवर दिलासा

जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांदीत मोठी दरवाढ झाली. चांदीने 5,000 रुपयांची मुसंडी मारली. या 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. तर 9 जुलै रोजी किंमती 500 रुपयांनी उतरल्या. 10 जुलै रोजी किंमती जैसे थे होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,500 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी उतरली. 24 कॅरेट सोने 72,616 रुपये, 23 कॅरेट 72,325 रुपये, 22 कॅरेट सोने 66,516रुपये झाले. 18 कॅरेट 54,462 रुपये, 14 कॅरेट सोने 42,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,793 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली