AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीदारांसाठी सुपर संडे! सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक, असे आहेत भाव

Gold Silver Rate Today : रविवारी सोने खरेदीची चांगली संधी चालून आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली नाही. या महिन्यात सोने-चांदीने जबरदस्त आगेकूच सुरु केली आहे. पण आज भावात बदल झालेला नाही. काय आहे आजची किंमत..

Gold Silver Rate Today : खरेदीदारांसाठी सुपर संडे! सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक, असे आहेत भाव
| Updated on: Jul 16, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली : सोन्याने जुलै महिन्यात कहर केला आहे. सोन्याचे भाव या पंधरा दिवसांत झरझर वाढत गेले. खरेदीदारांना भावात इतके वाढतील, याचा अंदाज नव्हता. चांदीने पण मोठी उचल खाल्ली. चांदीच्या किंमती झपाट्याने वाढल्या. अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम जागतिक बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात दिसून आला. डॉलर (Dollar) वर्षभराच्या निच्चांकावर पोहचल्याने सोने-चांदीने (Gold Silver Price Today) आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा मांड ठोकली. पण रविवारी सोने खरेदीची चांगली संधी चालून आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली नाही. या महिन्यात सोने-चांदीने जबरदस्त आगेकूच सुरु केली आहे. पण आज भावात बदल झालेला नाही. काय आहे आजची किंमत..

मे-जूनमध्ये घसरण

सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

जुलैमध्ये सोने-चांदी सुसाट

जुलै महिन्यात सोने-चांदीने मरगळ झटकून टाकली. दोन्ही धातूंनी जोरदार मुसंड मारली. सोन्याच्या किंमती पहिल्याच दिवशी वधारल्या होत्या. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची वृद्धी दिसून आली होती. . 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वाढले. 12 जुलै रोजी, सोने 200 रुपयांनी वधारले होते.13 जुलै रोजी सोन्यात 350 रुपयांची वृद्धी झाली.

काय आहे भाव

गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीत मोठी वाढ झाली नाही. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. जुलै महिन्यात सोने जवळपास 1400 रुपयांनी वधारले. तर चांदीने 5 हजार रुपयांची झेप घेतली.

चांदी वधारली

गुडरिटर्न्सनुसार, चांदीने 5000 रुपयांचा टप्पा ओलांडला. 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

  1. 24 कॅरेट सोने 59,338 रुपये
  2. 23 कॅरेट 59,100 रुपये
  3. 22 कॅरेट सोने 54,354 रुपये
  4. 18 कॅरेट 44,504 रुपये
  5. 14 कॅरेट सोने 34,713 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
  6. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  7. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते
  8. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान