AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : उच्चांकाकडे पुन्हा घौडदौड, सोने-चांदीची गगनावर स्वारी

Gold Silver Rate Today : सोन्याने पुन्हा उभारी घेतली आहे. चांदीने पण मरगळ झटकली आहे. त्यामुळे सराफा बाजारात चैतन्य पसरले आहे. आठवडाभरात सोने-चांदीने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे खरेदीदारांचे तोंडचे पाणी पळणार आहे.

Gold Silver Rate Today : उच्चांकाकडे पुन्हा घौडदौड, सोने-चांदीची गगनावर स्वारी
| Updated on: Jul 15, 2023 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली : सोन्याने पुन्हा उभारी घेतली. तर चांदीने पण मरगळ झटकली आहे. सराफा बाजारात सध्या चैतन्य पसरले आहे. या आठवड्यात सोने-चांदीने तुफान बॅटिंग केली. अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे हा योग जुळून आला आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी तफावत नाही. डॉलर (Dollar) वर्षभराच्या निच्चांकावर पोहचल्याने सोने-चांदीने आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा मांड ठोकली आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला आहे. सोने तर 58000 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. तर चांदी 67,000 हजारांच्या घरात आली होती. मे आणि जूनमध्ये खरेदीदारांची चांदी झाली. पण आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) पुन्हा उच्चांकाकडे धाव घेत आहेत.

मरगळ झटकली जुलै महिन्याने सोने-चांदीवरील नैराश्य झटकले. सोने-चांदीच्या किंमती पहिल्याच दिवशी वधारल्या होत्या. त्यानंतर गेल्या पंधरवाड्यात सोने-चांदीने तुफान खेळी खेळली. घसरणीपेक्षा दरवाढीची नोंद केली. मे आणि जून महिन्यात सातत्याने घसरण सुरु होती. जुलै महिन्यात सोने जवळपास 1400 रुपयांनी वधारले. तर चांदीने 5 हजार रुपयांची झेप घेतली.

या महिन्यात भरारी 14 जुलै रोजी किंमतीत मोठा बदल झाला नाही. 13 जुलै रोजी सोन्यात 350 रुपयांची वृद्धी झाली. 12 जुलै रोजी, सोने 200 रुपयांनी वधारले होते. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वाढले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची वृद्धी दिसून आली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.13 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

चांदी वधारली गुडरिटर्न्सनुसार, चांदीने 5000 रुपयांचा टप्पा ओलांडला. 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

  1. 14 जुलै, 24 कॅरेट सोने 59,338 रुपये
  2. 23 कॅरेट 59,100 रुपये
  3. 22 कॅरेट सोने 54,354 रुपये
  4. 18 कॅरेट 44,504 रुपये
  5. 14 कॅरेट सोने 34,713 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
  6. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  7. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते
  8. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप