AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदी सूसाट, दोन दिवसांत इतके वधारले भाव

Gold Silver Rate Today 3 February 2024 | बजेटपूर्वी आणि नंतर सोने-चांदीने कमाल दाखवली. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात दरवाढीने झाली. या दोन दिवसात सोने चकाकले तर चांदीने पण मोठा पल्ला गाठला. बजेटनंतर दोन्ही धातूत दरवाढ वर्तविण्यात येत होती.

Gold Silver Rate Today | सोने-चांदी सूसाट, दोन दिवसांत इतके वधारले भाव
| Updated on: Feb 03, 2024 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 3 February 2024 : बजेटपूर्वी आणि नंतर सोने आणि चांदीने कमाल दाखवली. दोन्ही धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. जागतिक बाजारात काही दिवसांपासून दरवाढीचे सत्र सुरु आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने गुंतवणूकदारांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दिली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर पण दिसून आला. जानेवारी महिन्यात दोन्ही धातूला नवीन रेकॉर्ड करता आला नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत सोने-चांदी चमकले. आता आशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 3 February 2024)

दोन दिवसांत वाढले भाव

गेल्यावर्षी दिवाळीनंतर आणि डिसेंबर महिन्यात सोन्याने सर्व उच्चांक मोडीत काढले. किंमती 66,000 रुपयांच्या घरात पोहचल्या. जानेवारी महिन्यात सोन्यात घसरण दिसली. सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्यात दरवाढ दिसली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही दरवाढ कायम होती. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी महागले. तर 2 फेब्रुवारी रोजी किंमतीत 160 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

जानेवारी महिन्यात ग्राहकांची चांदी झाली. 4400 रुपयांची घसरण दिसून आली. पण अखेरच्या आठवड्यात चांदीने 2 हजार रुपयांची उसळी घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किंमतीत चढउतार दिसून आला. 1 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. तर 2 फेब्रुवारी रोजी तेवढीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 63,142 रुपये, 23 कॅरेट 62,889 रुपये, 22 कॅरेट सोने 57,838 रुपये झाले. 18 कॅरेट 47,366 रुपये, 14 कॅरेट सोने 36,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,864 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?