AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीने आठवड्याची केली दमदार सुरुवात; असे वधारले भाव

Gold Silver Rate Today 30 January 2024 | सोने-चांदीने दरवाढीचा ट्रेंड कायम ठेवला. आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी सध्या एक महिन्यापासून दरवाढ होत आहे. सध्या सोने-चांदीचे भाव गेल्या महिन्यापेक्षा कमी आहे. आता बजेट तोंडावर आहे. बजेटनंतर सोने-चांदीच्या किंमतीत उसळी येण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीने आठवड्याची केली दमदार सुरुवात; असे वधारले भाव
| Updated on: Jan 30, 2024 | 8:44 AM
Share

नवी दिल्ली | 30 January 2024 : वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारीत सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. तर मधल्या काही दिवसात सोने-चांदीत दरवाढ झाली. तरीही डिसेंबर महिन्यापेक्षा या महिन्यात सोने-चांदीत स्वस्ताई आहे. ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. आता बजेट अगदी तोंडावर येऊन ठेपले आहे. बजेटनंतर सोने-चांदीच्या किंमतीत उसळी येण्याची शक्यता आहे. सध्या अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 30 January 2024)

सोन्यात किंचित वाढ

जानेवारी महिन्यात सोन्यात घसरणीचे सत्र होते. मधल्या काही दिवसात दरवाढ दिसून आली. जानेवारीत सोने 2200 रुपयांनी उतरले. या आठवड्यात सोन्याचा भाव शंभर रुपयांनी वाढला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण वधारली

जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. चांदीत 4400 रुपयांची घसरण दिसली. गेल्या आठवड्यात मात्र एकूण 1000 रुपयांनी चांदी महागली. सोमवारी 29 जानेवारी रोजी 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57,264 रुपये झाले. 18 कॅरेट 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,371 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?