AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याने पण दिला दिलासा, अशी आहे किंमत

Gold Silver Rate Today 4 February 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीत दरवाढ झाली होती. जानेवारीच्या अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरुवातील ग्राहकांच्या खिशावर भार पडला. मौल्यवान धातूचे भाव वधारले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोने 300 रुपयांनी तर चांदीत ही मोठी वाढ झाली होती. आता या किंमतीत घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याने पण दिला दिलासा, अशी आहे किंमत
| Updated on: Feb 04, 2024 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 4 February 2024 : अर्थसंकल्पाच्या काळात सोने-चांदीने उसळी घेतली होती. जानेवारी महिन्याच्या अखेरीस आणि सुरुवातीच्या दोन दिवसांत ही दरवाढ दिसून आली. जानेवारी महिन्यात सोने-चांदीत चढउताराचे सत्र होते. डिसेंबर 2023 सारखा कोणताही विक्रम मौल्यवान धातूंना करता आला नाही. जानेवारीत दोन्ही धातूत कमालीची घसरण झाली. सोने 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांची घसरण दिसून आली होती. फेब्रुवारीच्या सुरुवातील सोने 300 रुपयांनी तर चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. आता या किंमतीत घसरण झाली. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 4 February 2024).

वाढीनंतर सोन्यात घसरण

जानेवारी महिन्यात सोन्याला उंच झेप घेता आली नाही. सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही दरवाढ कायम होती. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण

जानेवारी महिन्यात चांदीने कमाल केली होती. चांदीत 4400 रुपयांची घसरण दिसून आली. जानेवारीच्या अखेरीस चांदीने 2 हजार रुपयांची उसळी घेतली. फेब्रुवारीची सुरुवात चढउताराने झाली. 1 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण. तर 2 फेब्रुवारी रोजी तितकीच वाढ झाली. 3 फेब्रुवारी रोजी थेट 1,000 रुपयांनी भाव आपटला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 63,142 रुपये, 23 कॅरेट 62,889 रुपये, 22 कॅरेट सोने 57,838 रुपये झाले. 18 कॅरेट 47,366 रुपये, 14 कॅरेट सोने 36,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,864 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक