
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बॅकेच्या ग्राहकांना काही तासांसाठी युपीआय सेवा वापरता येणार नाही. याबाबत बँकेने ग्राहकांना माहिती दिली आहे. यानुसार 12 सप्टेंबर 2025 रोजी सिस्टम मेंटेनन्समुळे एचडीएफसी बँकेचे ग्राहक यूपीआय सेवा वापरू शकणार नाहीत. यामुळे ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 90 मिनिटांसाठी युपीआय सेवा वापरता येणार नाही. या काळात बँकेशी संबंधित महत्वाच्या डिजिटल सेवांवर परिणाम होणार आहे. बँकेच्या अॅपवरून पेमंट, रुपे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट आणि एचडीएफसी खात्यातून थर्ड पार्टी अॅप्सद्वारे (गुगल पे, फोनपे) पेमेंट करता येणार नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला एचडीएफसी खात्यावर पेमेंट स्वीकारले तर त्यालाही त्रासाचा सामना करावा लागू शकते. यामुळे या काळात व्यवहार टाळण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.
90 मिनिटांसाठी एचडीएफसीच्या ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात HDFC बँकेने ग्राहकांना PayZapp वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे HDFC बँकेचे स्वतःचे डिजिटल पेमेंट अॅप आहे, ज्याद्वारे तुम्ही UPI बंद असतानाही व्यवहार करता येतो. यासाठी PayZapp डिजिटल वॉलेटसारखे काम करते. याद्वारे, बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, तसेच पैसे पाठवता येतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बँकेना हा पर्याय सुचवला आहे.
HDFC बँकेसह इतरही बँकांते ग्राहक देखील PayZapp वापरू शकतात. PayZapp खात्याची KYC केलेली नसेल तर तुम्ही दरमहा जास्तीत 10 हजार रुपयांचे व्यवहार करू शकाल. ज्या ग्राहकांनी KYC पूर्ण केली आहे असे ग्राहक दरमहा २ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करु शकणार आहेत. PayZapp मधील व्यवहार हे पासवर्ड, बायोमेट्रिक आणि पिनद्वारे सेक्यूअर केलेले आहेत. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे.
एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सेवा 24×7 उपलब्ध आहे. नेट बँकिंगद्वारे तुम्ही बँकेत न जाता 200 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवहार करू शकता. प्रत्येक एचडीएफसी ग्राहकाचे नेट बँकिंग खाते असते, त्यात लॉगिन केल्यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.