ह्युण्डाईची नवी कार कशी आहे?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई : ह्युण्डाई कंपनीनं आपली बहुचर्चित सॅन्ट्रो कार भारतात लॉन्च केली आहे. या कारची किंमत सुरुवातीला तीन लाख 90 हजार इतकी असेल. गेल्या अनेक दिवांपासून या कारची प्रतिक्षा केली जात होती. अखेर ह्युण्डाईनं ही कार लॉन्च केली आहे. सॅन्ट्रो कार ही अत्याधुनिक स्वरुपात डिझाईन केली असून, टॉलबॉय तंत्रज्ञानाने तयार केली आहे. कारमध्ये प्रीमियम केबिन,चांगला परफॉर्मन्स आणि आधुनिक सेफ्टी फिचर्स […]

ह्युण्डाईची नवी कार कशी आहे?
Follow us on

मुंबई : ह्युण्डाई कंपनीनं आपली बहुचर्चित सॅन्ट्रो कार भारतात लॉन्च केली आहे. या कारची किंमत सुरुवातीला तीन लाख 90 हजार इतकी असेल. गेल्या अनेक दिवांपासून या कारची प्रतिक्षा केली जात होती. अखेर ह्युण्डाईनं ही कार लॉन्च केली आहे.

सॅन्ट्रो कार ही अत्याधुनिक स्वरुपात डिझाईन केली असून, टॉलबॉय तंत्रज्ञानाने तयार केली आहे. कारमध्ये प्रीमियम केबिन,चांगला परफॉर्मन्स आणि आधुनिक सेफ्टी फिचर्स यांचा समावेश करण्यात आला आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये कुटुंबासोबत एकत्र प्रवास करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

ही कार बाजारात सात रंगांमध्ये उपलब्ध असेल. सॅन्ट्रो कारच्या डिझाईनचं थीम Rhythmical Tension वर आधारित आहे. यामुळे कारला नवीन लूक प्राप्त झाला आहे.

तसेच, कारमध्ये 17.64 सेमी. टच स्क्रीन, ऑडियो-व्हिडीओ सिस्टीमचा समावेश आहे. त्याचप्रकारे या मल्टी-मीडिया सिस्टीममध्ये अँण्ड्राईड ऑटो, अॅपल कार प्ले, मिरर लिंक आणि आईब्लू स्मार्टफोन अॅपसोबत वॉईस रिकॉग्निशन फंक्शन यांचा समावेश आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टॅण्डर्ड इबीडीसोबत एबीएस ड्युअल फ्रंट एअरबॅग, ऑटो डोअर लॉक,  रिअर पार्किंग सेंसर, चार सिलेंडर आणि ऑटो डोअर लॉक अशी आधुनिक फिचर्स उपलब्ध आहेत.