
LIC मध्ये खातं असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नसल्याचं समोर आलंय. पॉलिसीधारकांनी दावा न केलेल्या पॉलिसीचे हे पैसे पडून आहेत.

पैसे परत मिळवण्यासाठी काही कालावधी ठरवलेला असतो. तो निघून गेला की, या रकमेवर तुम्हाला हक्क सांगता येत नाही. त्यामुळे जर तुमचेही पैसे एलआयसीमध्ये जमा असतील, तर ते वेळीच काढून घ्या.

Jan Dhan Account

इथं क्लिक केल्यास एलआयसीचं एक पेज उघडेल. यामध्ये पॉलिसीधारकांना खात्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर ‘Unclaimed and Outstanding amounts to Policyholders’ असं लिहिलेलं असतं.

तुमच्या खात्याविषयी माहिती मिळवण्यासाठी पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड द्यावा लागेल. विचारलेली माहिती रकान्यांमध्ये भरल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ठेवीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

सगळ्यात आधी LIC च्या होम पेजवर जा. होम पेजवर डाव्या बाजूला ‘सर्च’ टॅब असेल, त्यामध्ये ‘Unclaimed amounts’ टाईप करा

त्यानंतर https://customer.onlinelic.in वर जाऊन Unclaimed Policy Dues Controller वर क्लिक करा. यानंतर दिलेली संपूर्ण माहिती भरा.

काही दिवसांनी ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर वेळेत पैसे काढणे खूप महत्त्वाचे असेत.