Inflation : अन्न, निवारा आणि आता वस्त्रही झाले महाग; कपड्यांची किरकोळ महागाई 9.19 टक्क्यांवर

बाजार समित्यांमध्ये कापसाचा (Cotton) भाव कमी झालाय. मात्र, कपड्यांच्या (clothes) किंमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मेमध्ये कपड्यांची किरकोळ महागाई (inflation) 8.53 टक्के होती. तर जूनमध्ये महागाई वाढून 9.19 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Inflation : अन्न, निवारा आणि आता वस्त्रही झाले महाग; कपड्यांची किरकोळ महागाई 9.19 टक्क्यांवर
Image Credit source: Social Media
अजय देशपांडे

|

Aug 06, 2022 | 8:09 AM

नवी दिल्ली : बाजार समित्यांमध्ये कापसाचा (Cotton) भाव कमी झालाय. मात्र, कपड्यांच्या (clothes) किंमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मेमध्ये कपड्यांची किरकोळ महागाई (inflation) 8.53 टक्के होती. तर जूनमध्ये महागाई वाढून 9.19 टक्क्यांवर पोहोचली आहे. कमी उत्पादनामुळे कापसाचा पुरवठा कमी आहे. पुरवठा नसल्यामुळे कपडे महाग झाले आहेत. या वर्षी देशात 315 लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. कापसाचं उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा 38 लाख गाठींनी कमी आहे. टेक्सटाईल इंडस्ट्रीची गरज 315 लाख गाठींची आहे. म्हणजेच गरजे एवढंच उत्पादन आहे. तसेच यंदा 38 लाख गाठी कापसाची निर्यात झालीये. म्हणजेच उत्पादन कमी असतानाही निर्यात झाल्यानं कापसाची कमतरता जाणवत आहे. कापड व्यवसायाला आता यंदाच्या कापूस उत्पादकांकडून अपेक्षा आहे. मात्र, नवीन कापसाचं पीक हे सप्टेंबर महिन्यात बाजारात येणार. तोपर्यंत गेल्यावर्षीचा उर्वरित कापसाचा साठाही अपुरा पडू शकतो. गेल्या वर्षी बाजार समितीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 72 लाख गाठी कापसाचा साठा होता. यावर्षी जुना स्टॉक हा फक्त 47 लाख गाठी एवढाच राहण्याचा अंदाज आहे.

लागवड क्षेत्र वाढले

कापड इंडस्ट्रीला नवीन उत्पादनाची अपेक्षा आहे. परंतु नवीन पीक हे सप्टेंबरमध्ये बाजारत येईल तोपर्यंत असलेला कापूसदेखील कमी पडेल. गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये कापसाचे उत्पादन येण्यास सुरुवात झाली होती, तोपर्यंत तब्बल 78 लाख गाठी कापूस शिल्लक होता. यावर्षी केवळ 47 लाख गाठी शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुनलेत कापसाच्या लागवडीत वाढ झालीये. 29 जुलैपर्यंत देशभरात 117 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आलीये. गेल्यावर्षी 111 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टी

चांगला पाऊस झाल्यास वाढलेल्या पेऱ्यामुळे कापसाचा उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, यंदा पावसानं बऱ्याच भागात ओढ दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यावर्षी गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि राजस्थान या प्रमुख कापूस उत्पादक राज्यात अति पाऊस झालाय तेलंगणामध्ये पावसाच्या सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. आता पावसानं विश्रांती घेतल्यानं चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. कापसाच्या उत्पादनात घट झाल्यास कापसाची आयात करावी लागू शकते. तसे झाल्यास कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें